शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानाच्या याद्या अपलोड करण्यास टाळाटाळ करणाऱ्या १४ कृषी सहाय्यकांवर गुन्हा

By दिपक ढोले  | Updated: August 26, 2023 17:28 IST

या कृषी सहायकांना महसूल प्रशासनाने नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही.

जालना : अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून त्या पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामास टाळाटाळ करणाऱ्या जालना तालुक्यातील १४ गावातील कृषी सहायकांवर तालुका जालना पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

२०२२ मध्ये जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी मदत जाहीर केली होती. त्यानुसार कृषी सहायकांना शेतकऱ्यांचे बँक खाते, आधार क्रमांक व अन्य माहिती असलेल्या याद्या तयार करून शासनाच्या पोर्टवरील विहीत वेळेत अपलोड करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाने दिले होते. या संदर्भात जून व जुलै महिन्यात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत वारंवार झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत जालना तालुक्यातील १४ कृषी सहायकांनी १५ गावांमधील शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टवलवर अपलोड केल्या नसल्याची समोर आले.

या कृषी सहायकांना महसूल प्रशासनाने नोटिसा बजावून खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांना शिस्तभंगाच्या कार्यवाहीची नोटीस दिली होती. त्यानंतरही संबंधित कृषी सहायकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्याच नाही. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानंतर नायब तहसीलदार दिलीप शेनफड सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात १४ कृषी सहायकांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक जनार्धन शेवाळे हे करीत आहेत.

या कृषी सहाय्यकांवर दाखल झाला गुन्हाआपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल झालेल्या कृषी सहायकांमध्ये एम. एस. घोरपडे (हिस्वन बु.), ए. एन. सोनवलकर (चितळीपुतळी), व्ही. के. पुंड (रेवगाव), जी. एल. ढवळे (वडीवाडी, ममदाबाद), एस. एस. काकडे (नागापूर), जे. के. तायडे (उमरी), बी. जे. कदम (पळसखेडा), एन. जी. राठोड (कवठा), यु. बी. बंगाळे (माळेगाव खु.), यु. डी. ख़ांडेभराड (थार), जी. ए. अंभोरे (खणेपुरी), व्ही. आर. कुलकर्णी (तांदुळवाडी बु.), एस. के. भुतेकर (रायगव्हाण), बी. एल. वाघ (अंबेडकरवाडी) यांचा समावेश आहे.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी