जालना : तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील दत्तात्रय ज्ञानेश्वर काळे यांनी २७ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांची दुचाकी जालना शहरातील माऊलीनगर भागात लावली होती. ती दुचाकी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी दत्तात्रय काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक राठोड हे करीत आहेत.
महिलेची आत्महत्या ; तिघांविरुध्द गुन्हा
जालना : अंबड तालुक्यातील दह्याळ येथील सुष्मा बर्वे यांनी २२ डिसेंबर रोजी सकाळी पैठण प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली. गणेश दगडू बर्वे व इतर दोन महिलांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून सुष्मा बर्वे यांनी आत्महत्या केल्याची तक्रार दत्ता शिंदे यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि वारे हे करीत आहेत.
डी-मार्ट मॉल परिसरातून दुचाकीची चोरी
जालना : शहरातील मोरंडी मोहल्ला भागात राहणारे रोहित प्रभाकर घुले (ह.मु. रामनगर ख्रिस्ती कॉम्प) यांनी त्यांची दुचाकी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी डी-मार्ट मॉलच्या पार्किंगमध्ये लावली होती. ती दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रोहित घुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकी चोराविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक साळवे हे करीत आहेत.
बँक खात्यातून १८ हजार रुपये लंपास
जालना : शहरातील चंदनझिरा भागात राहणाऱ्या संध्या गवई यांच्या एटीएम कार्डच्या यूपीआयएनचा वापर करून २२ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या बँक खात्यातील १८ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी संध्या गवई यांनी दिलेल्या तक्रारीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि. शामसुंदर कौठाळे हे करीत आहेत.
आदर्श कॉलनीतून दुचाकीची चोरी
परतूर : माजलगाव शहरातील रहिवासी भगवान नागोराव देशमुख यांनी १९ डिसेंबर रोजी रात्री त्यांची दुचाकी परतूर शहरातील आदर्श कॉलनी भागात लावली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी भगवान देशमुख यांनी दिलेल्या तक्ररीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना. शेख हे करीत आहेत.