शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ; ओबीसी आरक्षण बचावचे हाके, वाघमारे उपोषणावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 13:49 IST

लक्ष्मण हाकेंच शिष्टमंडळ मुंबईला चर्चेसाठी जाणार

- पवन पवार 

वडीगोद्री ( जालना) : कॅबिनेट बैठकीत चर्चा करून मार्ग काढू, चर्चेसाठी शिष्टमंडळ मुंबईला पाठवा, असे आश्वासन देत राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने ओबीसी आरक्षण बचावचे नेते लक्ष्मण हाके व सहकारी नवनाथ वाघमारे यांना पाणी घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. यामुळे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके सहकारी नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचावसाठी वडीगोद्री येथे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेले आहेत. आज सकाळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या शिष्टमंडळाने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपोषण सोडून यावं, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. मात्र, हाके यांनी सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतरच उपोषण सोडणार असा पवित्रा घेतल्याने शिष्टमंडळाची शिष्टाई निष्फळ ठरली. दरम्यान, ओबीसींना हक्क, अधिकार नाहीत का? सरकार फक्त ठराविक वर्गाचा आहे का? असा सवाल हाके यांनी केला. यावेळी वडीगोद्री येथे राज्यभरातून मोठा जनसमुदाय ओबीसी आरक्षण बचावाला पाठींबा देण्यासाठी येत आहे.

ओबीसींच्या छोट्या घरात घुसखोरीजरांगे सांगतात की ओबीसी आमचा भाऊ आहे, आमच्यात भाईचारा आहे आणि दुसरीकडे ते ओबीसी नेत्यांना टार्गेट करतात.  ओबीसी भाऊ आहे तर हक्क, अधिकार हिरावून घेत, असताना त्यांचे घर उध्वस्त करतात. ओबीसींच्या छोट्या घरामध्ये घुसखोरी करत असताना तुम्ही त्यांचे मित्र कसे असू शकतो? जरांगे ना शासनामार्फत रेड कार्पेट आथरल जातं, असा आरोप देखील हाके यांनी केला आहे. 

उपोषण सोडून चर्चेला यावेउपोषण सोडून चर्चेला यावं,मी तुमची मागणी सरकार दरबारी मांडून मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.- अतुल सावे, पालकमंत्री जालना 

आरक्षणाला धक्का लागणार नाहीपाणी पिऊन उपोषण करावे. उद्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून निर्णय कळवला जाईल. ओबीसी यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे.- डॉ.भागवत कराड, माजी केंद्रीय मंत्री 

सकारात्मक चर्चा होईल शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा घडवून आणू,मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करू - संदिपान भुमरे, खासदार

शिष्टमंडळ चर्चेला जाईल जो पर्यंत राज्य सरकार कडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही याचं लेखी आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत उपोषण आम्ही सोडणार नाही समाजावर जो अन्याय होतोय, त्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत.आम्ही चर्चेसाठी मुख्यमंत्र्याकडे जाणार नाही, आम्ही आमचे शिष्टमंडळ पाठवू शिष्टमंडळातील सदस्यांची नावं लवकरच सांगणार.- नवनाथ वाघमारे (उपोषणकर्ते)

लेखी द्यावेराज्याचं शासन आणि महाराष्ट्रातील सर्वच नेते म्हणताय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही तर कसा लागत नाही याचं आम्हाला राज्य शासनाकडून लेखी प्रमाणपत्र पाहिजे. ओबीसींना कळत नाही असं शासनाने समजू नये,आमचा समाज शांती प्रिय आहे, आम्ही सामाजिक तेढ निर्माण करत नाही.- लक्ष्मण हाके,ओबीसी नेते

टॅग्स :OBC Reservationओबीसी आरक्षणJalanaजालनाlaxman hakeलक्ष्मण हाके