शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
2
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
3
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी,'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
4
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
5
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा उत्पादन परवाना रद्द; तामिळनाडू सरकारने कंपनी बंद करण्याचे दिले आदेश!
6
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
7
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
8
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
9
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...
10
"वादळांविरुद्ध लढण्यात एक वेगळीच मजा असते...", कोर्टाच्या निर्णयानंतर तेजस्वी यादवांची पहिली प्रतिक्रिया
11
DSP सिराज नंबर वन! झिम्बाब्वेच्या गड्याला टाकले मागे; पण इथं टॉप ५ मध्ये दिसत नाही बुमराहचं नाव
12
मजुराला रस्त्याच्या कडेला सापडला एक दगड, घरी नेल्यावर कळलं की...; क्षणात आयुष्य बदलले!
13
Shani Gochar 2025: शनि देवाची खास दिवाळी भेट: २० ऑक्टोबरपासून 'या' ८ राशींच्या तिजोरीत होणार धनवृद्धी!
14
दिवाळी धमाका! 'या' कंपनीची फ्लाइंग कनेक्शन्स सेल; फक्त २००० रुपयांमध्ये करा हवाई प्रवास
15
Bihar Election 2025: प्रशांत किशोर यांनी ६५ मतदारसंघात उघडले पत्ते; कोणाला उमदेवारी?
16
कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्राणूंमध्ये झाला मोठा बदल, नव्या अपत्यांमध्ये चिंता वाढली
17
GMP देतोय संकेत, ₹१५५० च्या पार लिस्ट होऊ शकतो 'हा' IPO; पहिल्यांदा जीएमपी ₹४०० पार
18
Harshita Dave : रील बनवण्याची आवड पण स्वप्न मोठी; २२ व्या वर्षी झाली डेप्युटी कलेक्टर, तुम्हीही कराल कौतुक
19
बिग बींशी उद्धटपणे बोलला, त्यांच्यावर ओरडला! शेवटी अतिआत्मविश्वास नडला, आगाऊ इशितची ५व्या प्रश्नावरच उडाली विकेट
20
खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडली; मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात केले दाखल

coronavirus : उत्तरप्रदेशमध्ये जाणाऱ्या कामगारांसाठी विशेष रेल्वे; ५९५ रूपये रेल्वे भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 19:22 IST

कामगारांना तहसील कार्यालयात ५९५ रूपये रेल्वे भाडे भरून नोंदणी करावी लागणार    

ठळक मुद्दे१२०० प्रवाशांची नोंदणी झाल्यानंतर होणार मार्गस्थ

जालना : करमाडजवळ रेल्वे अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर परप्रांतीय कामगार, मजुरांना परत पाठविण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत. कामगारांनी आपापल्या तहसील कार्यालयात ५९५ रूपये रेल्वे भाडे भरून नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. उत्तरप्रदेश राज्यातील उन्नाव जिल्ह्यात जाण्यासाठी १२०० जणांची नोंद झाल्यानंतर पहिली विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे.

जालना येथील कंपनीत काम करणाऱ्या १७ परप्रांतीय मजुरांचा करमाड नजीक झालेल्या रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने परप्रांतीय मजुरांना परत पाठविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात जाणाऱ्या कामगार, मजुरांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी ५९५ रूपये भाडे आकारण्यात येणार आहे. तहसील कार्यालयाकडून प्राप्त होणाऱ्या याद्यानुसार राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे संचालक मनोज देशमुख हे रेल्वे विभागाशी संपर्क साधणार आहेत. १२०० जणांची नोंद झाल्यानंतर रेल्वे विभागाकडून त्यांच्या तिकीटाची सोय करण्यात येणार आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर हे संबंधितांची आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र, मास्क देण्याचे नियोजन करणार आहेत. संबंधित कामगार, मजुरांनी आपल्या भागातील तहसील कार्यालयाकडे रेल्वे भाडे आणि आपली नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

११०३ अहवाल निगेटिव्हजालना जिल्ह्यात आजवर ११९५ कोरोना संशयित आढळून आले आहेत. स्वॅब घेतलेल्यांपैकी ११०३  जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर केवळ ८ अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एक महिला कोरोनामुक्त झाली असून, इतर ७ जणांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पुर्न तपासणीसाठी २२८ स्वॅब प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

रेल्वे मंत्र्यांकडे केला पाठपुरावाजालना तसेच मराठवाड्यातील अन्य भागांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आहेत. या सर्वांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राज्यात आणि मूळ गावी जायचे आहे. यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करण्याकरिता आपण रेल्वेमंत्री पियूश गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने या विनंतीला मान दिला. लवकरच जालना येथून प्रवासी संख्या निश्चित झाल्यानंतर विशेष रेल्वे सोडली जाणार आहे.- रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना