शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

CoronaVirus : जालना जिल्ह्यातील अठराशे मजूर निजामाबाद जवळ अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 18:42 IST

जालन्यात परतत असताना रोखले सीमेवर

जालना : शेतीकामासाठी आंध्रप्रदेशमध्ये गेलेल्या जवळपास १ हजार ८०० मजुरांना ते जालना जिल्ह्यातील गावाकडे येत असतांना निजामाबाद सीमेवर त्यांना रोखण्यात आले. त्यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क करुन जालन्यात येण्याची विनंती केली. परंतु, ते शक्य नसल्याने आ. गोरंट्याल यांच्या विनंतीनंतर त्यांची जेवण आणि निवासाची व्यवस्था तेथे करण्यात आली आहे.

जालना शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहत आहे. यामुळे येथे परप्रांतीय म्हणजेच बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश येथून जवळपास ७ ते ८ हजार कामगार विविध उद्योगांमध्ये कार्यरत आहेत. त्यात विशेष करुन स्टील उद्योगात या कामगारांची संख्या अधिक आहे. जनता कर्फ्यू हा २२ मार्चला पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला. त्याचवेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रमुख उद्योजकांची बैठक बोलावून ३१ मार्चपर्यंत आपले उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. 

या जिल्हाधिका-यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील सर्वच लहान मोठे असे शंभर पेक्षा अधिक उद्योग बंद ठेवण्यात आले. त्यानंतर पुन्हा पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. परंतु जनता कर्फ्यूमध्येच सर्व उद्योग बंद असल्याने अनेक कामगारांनी त्याचवेळी आपआपल्या गावी रवाना झाले. त्यामुळे जालन्यातील हा प्रश्न निकाली निघाला आहे. परंतु सोमवारी आ. कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जालना जिल्ह्यातील आंध्रप्रदेशमध्ये शेती कामासाठी गेलेले शेतमजूर हे पायी निघाली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी लगेचच मजूराशी संपर्क साधून असे पायी येणे सोपे नसल्याचे सांगून तुमची सर्व व्यवस्था निजामाबादच्या मित्रांना सांगून करतो, असे सांगितले. त्यामुळे या कामगारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना