शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेस प्राधान्य; सर्व पोलीस ठाण्यांसमोर उभारली निर्जंतुकीकरण यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 13:20 IST

पोलीस मुख्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातही ही यंत्रणा बसविली जाणार आहे.

ठळक मुद्देपोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४०० पीपीई किटची मागणी मास्कसह सॅनिटायझरचेही केले वाटप

- विजय मुंडेजालना : कोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी अहोरात्र गस्त घालत आहेत. या अधिकारी, कर्मचा-यांसह ठाण्यात येणाऱ्या नागरिकांचे निर्जंतुकीकरण करणारी यंत्रणा जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रवेशद्वारावर बसविली जाणार आहे. पोलीस मुख्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातही ही यंत्रणा बसविली जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाली आणि पोलीस अधिकारी, कर्मचा-यांवरील बंदोबस्ताचा ताण अचानक वाढला. कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी नागरिकांनी घरात थांबावे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, सीमा बंदीचे कोणी उल्लंघन करू नये, चोऱ्य्या होऊ नयेत यासह कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्यासह सर्वच उपविभागीय पोलीस अधिकारी, जवळपास १०० अधिकारी आणि १८०० कर्मचारी, ५०० होमगार्ड अहोरात्र गस्त घालत आहेत. जुना जालना शहरातील दु:खीनगर भागातील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणेवरील ताण अधिकच वाढला आहे.

कोरोना विषाणूची साखळी मोडून काढताना पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी पोलीस मुख्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय, सर्वच पोलीस ठाणे, वाहतूक शाखेच्या कार्यालयासह जवळपास २५ ठिकाणी निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय अधिका-यांच्या सूचनेनुसार सॅनिटायझर वापरले जाणार असून, पोलीस ठाणे, मुख्यालयात प्रवेश करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. येथे कामानिमित्त येणा-या संबंधित नागरिकांचेही निर्जंतुकीकरण होणार आहे. प्रारंभी ही यंत्रणा शहरातील चारही ठाण्यात बसविली जाणार असून, ही यंत्रणा सर्वच ठाणे, संबंधित कार्यालयात कार्यान्वित होणार आहे. बंदोबस्तावरून घरी गेल्यानंतरही अधिकारी, कर्मचा-यांनी वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकूणच पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या आरोग्याच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.

५०००  हॅण्डग्लोज मिळणार, संस्था, संघटनांचीही मदतकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयात पोलीस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय कोरोना बाधित क्षेत्रातही अधिकारी, कर्मचारी कार्यान्वित आहेत. या संबंधितांच्या सुरक्षेसाठी ४०० पीपीई किटची मागणी करण्यात आली आहे. वरिष्ठस्तरावरून ७२०० मास्क मिळाले असून, संबंधितांना वाटप करणयात आले आहेत. तसेच सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले आहे. कर्मचा-यांच्या सुरक्षेसाठी वाढीव पाच हजार हॅण्डग्लोजची खरेदी केली जाणार आहे. शिवाय विविध संस्था, संघटनांचीही पोलीस अधिकारी, कर्मचाºयांना मोठी मदत होत आहे.

४०० वर खाजगी वाहने जप्तसंचारबंदीमुळे खाजगी वाहने रस्त्यावर आणण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर वाहने घेऊन येणाºयांची संख्या मोठी आहे. अशा चालकांवर कारवाई करून जवळपास ४०० वाहने आजवर जप्त करण्यात आले आहेत. संचारबंदी काळात यापुढेही वाहने जप्तीची कारवाई सुरूच राहणार आहे.

होम क्वारंटाइन व्यक्तीवर गुन्हाहोम क्वारंटाइन असताना घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. मनाई आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाºया एका होम क्वारंटाइन रूग्णावर पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो व्यक्ती कोरोना बाधित असलेल्या पुणे परिसरातून आला होता.

एसआरपीएफची प्लॅटून कार्यरतजिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर तैनात आहेत. सोबत आता एसआरपीएफची एक प्लॅटून कार्यरत झाली असून, ५०० होमगार्डही जिल्ह्याच्या विविध ठाणे हद्दीत बंदोबस्ताचे काम करीत आहेत.

निर्जंतुकीकरण वाहनही कार्यरतकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी विशेष व्हॅन तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन शहरातील विविध भागात फिरून सिनिटझरद्वारे पोलीस अधिकारी, कर्मचाºयांचे निर्जंतुकीकरण करीत आहे.

पोलिसांकडून धडक कारवाईकोरोना विषाणूची साखळी मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी अहोरात्र गस्त घालत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनीही घरात बसून प्रशासनाला सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर येणा-या नागरिकांवर आता धडक कारवाई केली जाईल.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना