शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जालनावासीयांच्या चिंतेत भर; ‘त्या’ महिलेचा पाचवा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 10:30 IST

महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल २१ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता.

ठळक मुद्दे ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे ६ एप्रिल रोजी समोर आले

जालना : शहरातील दु:खीनगर भागातील कोरोनाग्रस्त महिलेच्या स्वॅबचा चौथा अहवाल २१ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. मात्र, बुधवारी रात्री त्या महिलेच्या स्वॅबचा पाचवा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असून, प्रशासनासह जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

जालना शहरातील दु:खीनगर भागातील एका ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे ६ एप्रिल रोजी समोर आले होते. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रथम तीन वेळेस घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. २२ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या चौथ्या तपासणीचा अहवाल मात्र, निगेटिव्ह आला होता. त्यामुळे प्रशासनासह जिल्हावासियांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, अवघ्या काही तासातच परतूर तालुक्यातील शेलवडा येथील  शेतवस्तीवर राहणा-या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. 

दरम्यान, दु:खीनगर भागातील महिलेच्या स्वॅब पाचव्या वेळेस तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला होता. मात्र, बुधवारी रात्री उशिरा पुन्हा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जिल्ह्यात सध्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह महिला रूग्ण असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

६० जणांचे अहवाल प्रयोशाळेकडेपरतूर तालुक्यातील शेलवडा गावातील कोरोनाग्रस्त महिलेला प्रारंभी जालना येथील खासगी रूग्णायलात त्यानंतर शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या कालावधीत तिच्यावर उपचार करणाºया डॉक्टरांसह २० कर्मचाºयांचा स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. तसेच महिलेच्या पतीसह जवळपास ४० जणांचा स्वॅबही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalanaजालना