शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डायलर टोनवर कोरोनाची धून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 00:00 IST

मोबाईल डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृती केली जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चीन पाठोपाठ आता भारत देशातही कोरोना संशयित रूग्ण आढळून येत आहेत. महाराष्ट्रात अद्याप या कोरोनाचा एकही संशयित आढळून आलेला नाही. मात्र, दक्षतेचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने जागृती सुरू केली आहे. विशेष म्हणजे अनेकांच्या मोबाईल डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृती केली जात आहे. तर दक्षता म्हणून महिला दिनानिमित्त, धुलीवंदनानिमित्त होणारे कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रूग्णालयात विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शिवाय जिल्ह्यातील तालुका व ग्रामीणस्तरावरील मोठ्या रूग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विविध माध्यमातून कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेची जागृतीही केली जात आहे. विशेष म्हणजे गत काही दिवसांपासून अनेकांच्या मोबाईलच्या डायलर टोनवरही कोरोनाबाबत जागृतीची धून वाजत आहे. यात कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेची माहिती दिली जात आहे. पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मोबाईलवर ही डायलर टोन ऐकू येत आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांची जागृती होण्यास मदत होत आहे. नागरिकांची गर्दी होणारे अनेक कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. काही शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीही मास्क वापरून दक्षता घेत आहेत.कृषी मंडळाचा कार्यक्रम रद्दकोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. जिलहाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही खबरदरीचे उपाय म्हणून गर्दीचे कार्यक्रम रद्द केले आहे. या अंतर्गत रविवारी होणारा कृषी विज्ञान केंद्रातील कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचे श्रीकृष्ण सोनुने यांनी सांगितले.हात जोडूनच स्वागत करावेकोरोना व्हायरसची लागण टाळण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तीक पातळीवरील स्वच्छता बाळगणे गरजेचे आहे. खोकणा-या व शिकंणाºयापासून दूर राहून हात जोडूनच स्वागत करावे.- राजेश राऊत, उपनगराध्यक्षा, जालना

टॅग्स :corona virusकोरोनाHealth Tipsहेल्थ टिप्सMedicalवैद्यकीय