जालना : जिल्ह्यातील ६६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे बुधवारी प्राप्त अहवालात आले आहे. जिल्ह्यात मंगळवारी ५५ तर बुधवारी ६६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यात जालना शहरातील ३६ जणांचा समावेश आहे.
बाधितांमध्ये जालना शहरातील ३६, शिरसगाव २, बोरगाव १, चांदई एक्को येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर शहर १, मंगलगाव १, वाटूर फाटा १, घनसावंगी ३, अंबड शहर ५, पिटोरी शिरसगाव येथील एकाला बाधा झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील आरखेडा १, भोकरदन शहर ३, तपोवन १, विलाडी
येथील एक, बुलडाणा जिल्ह्यातील ७ व औरंगाबादेतील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १४ हजार २५३ वर गेली असून, त्यातील ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर १३ हजार ६१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सूचनांचे पालन गरजेचे
जिल्ह्यात विशेषत: जालना शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी मास्कचा नियमित वापर, सुरक्षित अंतर व नियमित हात धुण्याचे नियम पाळणे गरजेचे आहे.