शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामाचे साहित्य गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:35 IST

मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील धामना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडले आहे. मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुलाच्या बांधकामाचे साहित्य पुरात वाहून गेले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे बांधकाम रखडल्याने ग्रामस्थांत संताप आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने धामना नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी तीन महिन्यांपासून खडी, गिट्टी, सळई इ. साहित्य आणून टाकले आहे. याला तीन महिने झाले आहेत. मात्र, अद्यापही पुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. पावसाचे दिवस असल्याने नदीच्या प्रवाहात साहित्य वाहून जाण्याची भीती लोकमतने १४ जून रोजी प्रसिध्द केलेल्या वृत्तात व्यक्त केली होती. मात्र वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले.सोमवार आणि मंगळवारी परिसरात झालेल्या जोरदार पावसाने पुलाच्या बांधकामासाठी आणलेली खडी, वाळू आणि लोखंडी सळई पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे पुलाच्या बांधकामाला आता जास्तीचा विलंब होणार असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी केली असून दोषीवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. तीन महिन्यांपासून धामना नदीवरील पुलाचे बांधकाम रखडले होते. परिसरातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यास रस्ताच नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असल्याने या मार्गावरुन अनेकांना ये- जा करावा लागतो. पुलाचे काम तीन महिन्यांपासून रखडल्याने बाजारकरूंची तसेच दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडत आहे. यामुळे बाजाराला येणा-या दुकानदारांची संख्या रोडावली. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे हा मार्ग मराठवाडा विदर्भ आणि खान्देशला जोडणारा मुख्य मार्ग आहे. याच मार्गावर पुढे भोकरदन तालुक्यातील जाळीचा देव, धावडा, शिवणा यानंतर अजिंठा गाव लागते. मात्र, पुलाचे बांधकाम रखडल्याने या मार्गावरुन ये- जा करण्यास अडचणी येत आहेत. तसेच परिसरातील शेतक-यांची गैरसोय होत आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसpwdसार्वजनिक बांधकाम विभाग