शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

लाच स्वीकारणारा कॉन्स्टेबल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 11:18 IST

चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. येथील कदीम जालना पोलीस ठाण्यात आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. राजेंद्र तुळशीराम वेलदोडे (४८ रा. रामनगर पोलीस कॉलनी) असे लाच स्वीकाणा-या कॉन्स्टेबलचे नाव आहे.या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलाच्या नावावर नूतन वसाहत भागात देशी दारूचे दुकान आहे. वडिलांच्या निधन झाल्यामुळे देशी दारू दुकानाचा परवाना तक्रारदारास आईच्या नावे करायचा होता. यासाठी कदीम जालना पोलीस ठाण्यातून आईच्या नावे चारित्र्य पडताळणी अहवालाची आवश्यकता असल्याने तक्रारदार या संबंधीचे काम पाहणा-या गोपनीय शाखेतील राजेंद्र वेलदोडे यास २० मार्चला भेटले. चारित्र्य पडताळणी अहवाल देण्यासाठी वेलदोडे याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. कुठलाही गुन्हा दाखल नसताना अहवालासाठी पैसे कशाला लागतात, अशी विचारणा तक्रारदाराने केली. तेव्हा वेलदोडे याने दहा हजार रुपये देण्याची मागणी केली. आता पाच हजार रुपये द्या. . उर्वरित पाच हजार काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. नाईलाजास्तव तक्रारदाराने पाच हजार रुपये दिले. मात्र, उर्वरित रकमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.लाचलुचपत विभागाने लाचेच्या मागणीची पडताळणी करून कदीम जालना पोलीस ठाण्यात सापळा लावून वेलदोडे यास तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेंद्र निकाळजे, पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद, विनोद चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, प्रदीप दौंडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर, रामचंद्र कुदर, गंभीर पाटील, महेंद्र सोनवणे, संदीप लव्हारे, ज्ञानेश्वर म्हस्के, प्रवीण खंदारे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :PoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारPolice Stationपोलीस ठाणेAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग