लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात विकासाची अनेक कामे केल्यामुळेच युवकांची काँग्रेस पक्षाला पसंती मिळत असून, पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानच होईल, अशी ग्वाही माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.शहरातील प्रभाग क्रमांक २० व २१ मधील असंख्य युवकांनी बुधवारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी संजय भगत, रईस कुरैशी, आसेफ कुरैशी, जमील कुरैशी, जलील कुरैशी यांची उपस्थिती होती. यावेळी रईस कुरैशी व आसेफ कुरैशी मित्र मंडळातील शाहरुख कुरैशी, नवशाद कुरैशी, इमरान कदीर कुरैशी, इमरान कुरैशी, असलम कुरैशी, युसुफ कुरैशी, अन्सार कुरैशी, सोहेल कुरैशी, मसुद कुरैशी, सादेक अब्दुल रहेमान कुरैशी, मोसीन बागवान, रेहान बागवान यांच्यासह इतर शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
विकास कामांमुळेच युवकांची काँग्रेसला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:08 IST