शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांच्या विरोधात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:16 IST

अंबड, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर नद्या, नाल्यांमधील वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे होत आहे. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना/अंबड : अंबड, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर नद्या, नाल्यांमधील वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे होत आहे. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी या विरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्या उपोषणाला चौदा दिवस पूर्ण झाले असून, त्याची दखल ना महसूल ना पोलीस प्रशासाने घेतल्याने ते आता आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाच्या तयारीत आहेत.अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील वाळू उपशाची अनेक प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. काही ठिकाणी पोलीस तसेच महसूलच्या भरारी पथकावर हल्ले करून त्यांना जखमी करण्यात आले आहे. हे सर्व घडत असताना यात दोन महिन्यापूर्वी महसूल विभागाच्या गौण खनिज विभागाच्या बोगस पावत्या देऊन सर्रासपणे वाळूचा उपसा सुरू असल्याने शासनाची लाखो रूपयांची रॉयल्टी बुडत आहे. ही राष्ट्रीय संपत्तीची हानी होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून पोलीस निरीक्षक देविदास शेळके तसेच पोलीस उपनिरीक्षक माने यांच्यातील वाळूचा ट्रक सोडण्यावरून जो मोबाईल मधिल संवाद आदी अनेक पुरावे प्रशासनाला चित्राल यांनी दिले मात्र त्याची दखल घेतली नाही.या विरोधात चित्राल यांनी अंबड येथील तहसील समोर एक मे पासून उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणालाही प्रशासन जुमानत नसून, चित्राल यांना कुठलेच ठोस आश्वासन न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. या विरोधात आ. बच्चू कडू यांनी आता लक्ष घातले आहे. ते देखील या मुद्यावर पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याचे त्यांनी अंबड दौऱ्यादरम्यान नमूद केले होते. एकूणच महसूल, पोलीस आणि राजकीय नेत्यांच्या अर्थपूर्ण संबंधातून वाळूचे व्यवहार सुरू असल्याने त्यावर आळा बसवणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :sandवाळूSocialसामाजिक