शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागच्या राजाचं विसर्जन खोळंबलं, मूर्ती तराफ्यावर चढवताना आलं असं विघ्न, गिरगाव चौपाटीवर काय घडतंय?
2
अमोल मिटकरींचा यू-टर्न! ते ट्विट मागे घेतले, दिलगिरी व्यक्त केली; नेमकं प्रकरण काय?
3
धार्मिक विधीसाठी ठेवलेला १ कोटींचा सोन्याचा मंगल कलश चोरला! आधी धोती घालून रेकी, नंतर साधला डाव
4
पोस्ट ऑफिसच्या PPF योजनेत दरवर्षी ₹५०,००० जमा केल्यास मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
5
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
6
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
7
"नातवासाठी घेतलेल्या नवीन TESLA खेळण्याची किंमत किती आहे काका?", मराठी अभिनेत्याचा प्रताप सरनाईकांना टोला
8
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
9
अरेरे! लायब्ररी, जमीन विकून बायकोला शिकवलं; पोलिसात नोकरी मिळताच 'तिने' नवऱ्याला सोडलं
10
"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा
11
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
12
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
13
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
14
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
15
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
16
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
18
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
19
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
20
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच

'५०० कोटीची वसूली समोर येईल...'; धुळे कॅश प्रकरणात नार्को टेस्ट करा: कैलास गोरंट्याल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:25 IST

विरोधी पक्षानेही मुद्दा आक्रमकपणे उचलला नाही:

जालना : धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेचे प्रकरण विरोधी पक्षाने आक्रमकपणे उचललेले नाही. शिवाय होणारा तपासही योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे या प्रकरणात किशोर पाटील यांची नार्को टेस्ट करावी. या तपासणीनंतर आजवर ५०० कोटी रुपये वसूल केल्याचा प्रकार समोर येईल, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. नार्को टेस्ट झाली नाही तर आपण न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले.

गोरंट्याल यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने गठित केलेल्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर आणि या समितीतील अन्य आमदार सदस्य धुळे दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात किशोर पाटील यांच्या नावाने बुक असलेल्या एका खोलीत १ कोटी ८० लक्ष रुपयांची रक्कम धुळे पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष घालत या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी मुख्य आरोपींना मात्र राज्य सरकारकडून पाठीशी घालण्याचे काम होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला.

अंदाज समिती अध्यक्ष खोतकर यांचे स्वीय सहायक व मंत्रालयात अधिकारी पदावर कार्यरत असलेले किशोर पाटील यांच्यासह अन्य दोनजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात किशोर पाटील यांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करण्याची मागणीही गोरंट्याल यांनी केली. राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला तर त्यांना तीन वर्षे जेलमध्ये ठेवण्यात आले. मात्र, धुळे प्रकरणात अपेक्षित तपास होत नसल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला. दरम्यान, यासंदर्भात अर्जुन खोतकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

गोरंट्याल-खोतकर वाद जुनाचकाँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. शासकीय मेडिकल कॉलेज, पाणीपुरवठा योजनेच्या श्रेयवादासह जालना विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवरून त्या दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात.

टॅग्स :Arjun Khotkarअर्जुन खोतकरJalanaजालना