शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

२४ हजार शेतकऱ्यांच्या आधारचे लिंकिंग पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:43 AM

शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. तर अद्यापही ६ हजार ५५९ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्जखात्याशी लिंक करण्याचे काम सुरू आहे.शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व परतफेड न केलेले अल्पमुदती पिककर्ज, पुनर्गठीत पिककर्ज, फेर पुनर्गठीत पिककर्ज असलेले २ लाख ४ हजार ४६२ शेतकरी जालना जिल्ह्यात आहेत. पैकी १ लाख ७२ हजार ९०८ शेतक-यांच्या कर्ज खात्याशी आधार क्रमांक लिंक होता. मात्र, ३१ हजार ५५४ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक झालेला नव्हता. शासन निर्देशानुसार आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक नसलेल्या शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.याद्या प्रसिध्द झाल्यानंतर आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतक-यांनी आपला आधार क्रमांक कर्ज खात्याशी लिंक करून घेतला आहे. ६ हजार शेतक-यांचे काम अद्याप अपूर्णशासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय निकषात असलेल्या शेतक-यांनी आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत अद्यापही जालना जिल्ह्यातील ६ हजार ५५९ शेतक-यांचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी संलग्न झालेला नाही. यात सर्वाधिक एसबीआयचे १९४५ तर जिल्हा बँकेतील १४११, युनियन बँक आॅफ इंडियातील ११६४ शेतक-यांसह इतर बँकेतील शेतक-यांचा यात समावेश आहे.नियमित कर्ज फेडणारे२ लाख शेतकरीजिल्हा बँकेंतर्गत कर्ज घेतल्यानंतर ते नियमित फेडणा-या शेतक-यांची संख्या २ लाख १६ हजार २३१ इतकी आहे. या शेतक-यांनी ३७७ कोटी ९९ लाख ६३ हजार रूपयांचे कर्ज फेडले आहे. शासनाने कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांसाठी विशेष योजना जाहीर केली तर तब्बल २ लाख १६ हजार २३१ शेतक-यांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जgovernment schemeसरकारी योजनाFarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्ड