शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सातोना मंडळात ढगफुटी; १७३ मिमी पावसाची नोंद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 00:27 IST

परतूर तालुक्यातील सातोना महसूल मंडळात शनिवारी अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / परतूर : परतूर तालुक्यातील सातोना महसूल मंडळात शनिवारी अक्षरश: ढगफुटीसारखा पाऊस झाला. रविवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात या मंडळात तब्बल १७३ मिमी पाऊस झाला. तर सहा महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे.चालू वर्षात प्रथमच मागील २४ तासांत जालना जिल्ह्यात ४२.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची मंडळनिहाय आकडेवारी पाहता जालना ५३ मिमी, ग्रामीण १९ मिमी, रामनगर १७ मिमी, विरेगाव ३५ मिमी, नेर ११ मिमी, सेवली २९ मिमी, पाचनवडगाव ४२ मिमी, वाघ्रूळ जहागीर ६५ मिमी पाऊस झाला. बदनापूर तालुक्यात बदनापूर ४६ मिमी, रोषणगाव ४३ मिमी, दाभाडी ११५ मिमी, सेलगाव ४५ मिमी, बावणे पांगरी ५० मिमी पाऊस झाला. भोकरदन ३३ मिमी, सिपोरा बाजार २७ मिमी, धावडा ३९ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ४५ मिमी, हसनाबाद १२० मिमी, राजूर ५२ मिमी, केदारखेडा ३८ मिमी तर अनवा महसूल मंडळात ४५ मिमी पाऊस झाला. जाफराबाद २१ मिमी, टेंभुर्णी २८ मिमी, कुंभारझरी १९ मिमी, वरूड २० मिमी, माहोरा १९ मिमी पाऊस झाला. परतूर ८० मिमी, सातोना १७३ मिमी, आष्टी ३२ मिमी, श्रीष्टी ७८ मिमी, वाटूर महसूल मंडळात ५७ मिमी पाऊस झाला. मंठा तालुक्यात मंठा ५२ मिमी, ढोकसाल ४४ मिमी, तळणी ४ मिमी, पांगरी गोसावी ३१ मिमी पाऊस झाला. अंबड ३५ मिमी, धनगरपिंपरी २५ मिमी, जामखेड ३५ मिमी, वडीगोद्री ४१ मिमी, गोंदी १६ मिमी, रोहिलागड ३७ मिमी, सुखापुरी ९ मिमी पाऊस झाला. घनसावंगी ५६ मिमी, राणी उंचेगाव १६ मिमी, रांजणी ४० मिमी, तीर्थपुरी १५ मिमी, कुंभार पिंपळगाव ३५ मिमी, अंतरवली टेंम्बी ३१ मिमी तर जांभ समर्थ महसूल मंडळात १९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.परतूर तालुक्यासह सहा महसूल मंडळांत अतिवृष्टीपरतूर: परतूर तालुक्यात रविवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात सरासरी ८४.१० मिमी पाऊस झाला आहे. यात परतूर महसूल मंडळात ८० मिमी, सातोना १७३ मिमी, श्रीष्टी ७८ मिमी, वाटूर ५७ मिमी, तर आष्टी सर्कल मध्ये सर्वात कमी ३२ मिमी पावसाची नोंद झाली. आजवर तालुक्यात सरासरी ६०५. ५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.जालना तालुक्यात ३३.३८ मिमी, बदनापूर ५९.८० मिमी, भोकरदन ४९.८८ मिमी, जाफराबाद २१.४० मिमी, परतूर ८४.१० मिमी, मंठा ३२.७५ मिमी, अंबड २८.२९ मिमी तर घनसावंगी तालुक्यात ३०.२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :RainपाऊसweatherहवामानNatureनिसर्ग