जाफराबाद : जीएसटीच्या विरोधात देशव्यापी बंदमध्ये जाफराबाद तालुक्यातील सर्व व्यापारी, सराफा व्यावसायिक सहभागी झाले होते. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट होता.
जीएसटी लागू होऊन आता चार वर्षे लोटली आहेत. ही करप्रणाली लागू करताना केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करीत ही करप्रणाली कशी चांगली आहे, हे ठासून सांगितले होते. परंतु, नंतर या करप्रणालीने व्यापारी, उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. जवळपास एक हजारपेक्षा अधिक बदल या कायद्यातील विविध कलमांमध्ये करण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणून ही कर प्रणाली अत्यंत क्लिष्ट असल्याचे आता समोर आले आहे. याच्याविरोधात शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला जाफराबाद येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
व्यापाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सतीश सोनी यांना दिले. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बाबूराव लहाने, उपाध्यक्ष साहेबराव मोरे, फारेस चाऊस, सुरेश जंजाळ, उमेश खंडेलवाल, विजय कळंबे, मच्छिंद्रनाथ थोरात, सर्जेराव मरकड, संजय दीक्षित, गजानन फुके, संतोष मुरकुटे, विष्णू चव्हाण, ज्ञानेश्वर पाबळे, विशाल वाकडे, विशाल लोखंडे, प्रकाश खुणे, रावसाहेब जाधव, दिलीप देठे, ज्ञानेश्वर साखरे, तारेक चाऊस, विनायक भोपळे आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
260221\26jan_22_26022021_15.jpg~260221\26jan_23_26022021_15.jpg~260221\26jan_24_26022021_15.jpg
===Caption===
जाफराबाद येथे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देताना व्यापारी~जाफराबाद येथे दुकाने बंद ठेवून व्यापार्यांनी बंदला पाठिंबा दिला. ~सेवली- येथील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.