शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता सर्वेक्षणाची जालन्यात होणार तपासणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:39 IST

स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या निकषानुसार नगरपालिका प्रशासनातर्फे शहर स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या अभियानांतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची लवकरच विशेष पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. योग्य कामगिरी न करणाºया नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्याने देण्यात येणाºया अनुदानांमध्ये कपात करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अभियान : सर्वेक्षणात पालिका १०४ क्रमांकावर,सहा हजार ३०० नागरिकांनी डाऊनलोड केले स्वच्छता अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या निकषानुसार नगरपालिका प्रशासनातर्फे शहर स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. या अभियानांतर्गत शहरात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची लवकरच विशेष पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. योग्य कामगिरी न करणाºया नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राधान्याने देण्यात येणाºया अनुदानांमध्ये कपात करण्यात येणार आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची (नागरी) संपूर्ण राज्यात मशीन मोड पद्धतीने अमलबजावणी सुरू आहे. या अभियानांतर्गत शहरे हगणदारीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ओल्या व सुक्या कचºयाची विल्हेवाट लावणे, केंद्र सरकारचे स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करून त्याद्वारे प्राप्त तक्रारी सोडविल्या जातात का, या बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. या निकषांची पूर्तता करण्यासाठी जालना पालिकेतर्फे तीन महिन्यांपासून स्वच्छता अभियानावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आतापर्यंत शहरातील सहा हजार ३०० नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. याद्वारे प्राप्त तक्रारींची दखल घेण्यासाठी विशेष पथकही नियुक्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर घंटा गाड्यांद्वारे घरोघरी जावून ओला व सुका कचरा गोळा करणे, प्लॉस्टिक पिशव्यांचा वापरावर बंदी घालणे, शहरात पाऊचद्वारे होणारी पाणीविक्री थांबविणे, पाणी पाकिटांची विल्हेवाट न लावणाºयां उत्पादकांवर कारवाया करणे, यावर नगरपालिकेने मागील तीन महिन्यात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचºयापासून कंपोस्ट खत निर्मिती याबाबतच्या जनजागृती कार्यशाळाही घेण्यात आल्या आहेत.ही सर्व माहिती केंद्र सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली असून, त्या आधारे ‘अ’ वर्ग असलेली जालना नगरपालिका ४ हजार ४१ शहरांमध्ये सध्या १०४ क्रमांवर आहे. स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या निकषानुसार पालिकेने राबविलेल्या उपक्रमांची विशेष पथकाद्वारे लवकरच तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून आवश्यक तयारी केली जात आहे.जालना : तर अनुदानात कपात केली जाणार...स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत निर्धारित केलेली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बहुतांश शहरांमधून अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एप्रिल २०१८ पर्यंत शहरात निर्माण होणाºया ८० टक्के कचºयाचे जागेवर विलगीकरण करणे, स्वच्छता सर्वेक्षणातील गुणांनुक्रमात वाढ न करणे, कचºयाचे केंद्रित पद्धतीने कंपोस्ट खत निर्मिती करणयाची प्रक्रिया सुरू न करणाºया स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणारे शासकीय अनुदानात प्राधान्याने कपात करून हे अनुदान थांबविण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. अभियानाच्या अमलबजावणीबाबत जालना पालिकेची सद्यस्थिती पाहता, पालिकेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. जालना शहरातील अभियानाबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.