शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ग 'तीन'च्या कर्मचाऱ्यांना मोह आवरेना; दीडवर्षांत जालन्यात ३१ लाचखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 19:00 IST

शासकिय कार्यालयातील अधिकारी, किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे.

- शिवचरण वावळेजालना : शासकीय कर्मचाऱ्यांना मनासारखे वेतन असताना देखील अनेक शासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी लहान-मोठ्या कामासाठी सामान्य जनतेकडून १ हजार - पाचशे रुपये अशी चिरीमिरीची मागणी करतात. येथेच त्यांचा घात होतो. मागील सतरा महिन्यांत जालना जिल्ह्यातील वर्ग 'तीन'च्या ३१ कर्मचाऱ्यांना लाचेचा मोह आवरता आलेला नाही. ते एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत.त्या पाठोपाठ जिल्ह्यातील वर्ग दोन आणि वर्ग एकच्या अधिकारी यांचादेखील लाच स्वीकारण्यात समावेश आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने १ जानेवारी २०२३ ते १५ मे २०२४ या दरम्यान मृदा व जलसंधारण विभाग, पोलिस, महावितरण, महसूल, पंचायत समिती, वन विभाग, धर्मादाय,ग्रामविकास, जलसंपदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, समाजकल्याण, कृषी विभाग अशा विविध विभागांतील क्लासवन, क्लास २ अधिकारी आणि क्लास थ्री कर्मचारी यांच्यासह कंत्राटदार आणि खासगी व्यक्ती अशा विविध विभागांतील ५७ जणांविरोधात ३५ सापळे रचण्यात आले होते. या सापळ्यात दोन क्लास टू अधिकारी व ३१ क्लास थ्री कर्मचारी यांचा समावेश आहे. त्या नंतर चतुर्थ श्रेणीतील ८ व्यक्तींचा देखील लाच घेण्यात सहभाग असल्याने ते सापळ्यात अडकले आहेत. शासकिय कार्यालयातील अधिकारी, किंवा कर्मचारी लाच मागत असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन 'एसीबी'कडून करण्यात आले आहे.

खासगी व्यक्तीही ताब्यातलाच घेणे आणि स्वीकारण्यामध्ये खासगी कंत्राटदार आणि खासगी व्यक्तींचा देखील यात समावेश असून, मागील दीड वर्षात खासगी कंत्राटदारांकडून पैशाची मागणी करणे, पैसे न दिल्यास काम अडवून धरणे, शिवाय एखादे काम न करताच संबंधित कामाचे परस्पर बिल काढण्यासाठी लाचेचे प्रलोभन दाखवणे यासारख्या लोकांविरोधात देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून १४ जणांना जेरबंद करण्यात आले आहे.

लाच घेणे अन् देणे दोन्ही गुन्हा कुठलाही वरिष्ठ अधिकारी थेट लाच स्वीकारण्याचे धाडस करत नाही किंवा त्याचा थेट कुणाशी संपर्क येत नाही. अशावेळी जे ग्राउंडवर काम करणारे कर्मचारी असतात ते अगदी जुजबी पैशाची मागणी करतात अन् सापळ्यात अडकतात. प्रत्यक्षात लाच घेणे आणि देणे गुन्हाच आहे. त्यामुळे चार दोन पैशांसाठी लाच घेणे टाळले पाहिजे. - किरण बिडवे, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत विभाग, जालना

टॅग्स :JalanaजालनाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग