शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टाक्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:13 IST

नळाला अथवा विकत घेतलेले पाणी साठविण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाक्या, बॅरल खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. तसेच जायकवाडी धरणातूनही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने शहराला आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होतो. नळाला अथवा विकत घेतलेले पाणी साठविण्यासाठी बाजारात प्लास्टिकच्या टाक्या, बॅरल खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.जिल्ह्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पात यंदा पुरेशा प्रमाणात पाणी साठले नाही. यामुळे मार्च महिन्यापर्यत घाणेवाडी तलावाने तळ गाठला आहे. यामुळे तीन ते चार दिवसांनी येणारे पाणी आता आठवड्यातून एकदा येत आहे. तलावात पुरेशा प्रमाणात पाणी असतांनाही उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन्ही ऋतूतही नागरिकांची पाण्याविना गैरसोय होते, परिणामी अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागते.यामुळे शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही पाणीटंचाई तीव्र झाली आहे. यामुळे पाणी साठविण्यासाठी नागरिकाकडून प्लास्टिकच्या टाक्याची मागणी वाढली आहे. शहरातील मामाचौक, बाजार परिसरात असलेल्या दुकानांमध्ये प्लास्टिकच्या टाक्याखरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.पाण्याची नासाडीशहरात पाणी सोडण्याची कुठलीच ठराविक वेळ नाही. यामुळे रात्री - बेरात्री नळाला पाणी येते. तसेच शहरातील बहुतांश नळाला तोट्या नसल्याने मोठ्या प्रमाणात पिण्यायोग्य पाणी वाहून जाते. एकीकडे पाणी नसल्याची ओरड होत असतांना पाण्याच्या नासाडीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांचे हाल सुरु आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMarketबाजार