शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्हा रुग्णालयात सुरू होणार केमोथेरपी युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:49 IST

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह इतर कारणांनी होणाऱ्या कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार पध्दती युनिट लवकरच जालना जिल्हा रूग्णालयात सुरू होणार आहे

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासह इतर कारणांनी होणाऱ्या कॅन्सरवरील केमोथेरपी उपचार पध्दती युनिट लवकरच जालना जिल्हा रूग्णालयात सुरू होणार आहे. या युनिटमध्ये मौखिक कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. युनिटसाठी लागणा-या औषधींची मागणीही वरिष्ठस्तरावर करण्यात आली आहे.धावपळीच्या युगात बदललेली जीवनशैली, असंतुलीत आहार, आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष, औषधांचा अतिरेक, तंबाखूजन्य पदार्थांसह इतर जडलेली व्यसने अशा एक ना अनेक कारणांनी विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. यात कॅन्सरसारख्या आजाराचा विळखाही वाढू लागला आहे. यापूर्वी ४५-५० वर्षावरील कॅन्सरचे अधिक रूग्ण आढळून येत होते. मात्र, आता हे प्रमाण ३० वर्षापर्यंत आले आहे. कॅन्सरग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी लाखो रूपयांचा खर्च संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांना करावा लागतो. जालना जिल्ह्यात आढळून येणाºया रूग्णांना खासगी रूग्णालयात किंवा औरंगाबादसह इतर मोठ्या शहरांमध्ये जाऊन कॅन्सरवरील उपचार घ्यावे लागत होते. यात रूग्णांचा वेळ आणि पैसाही जात होता. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या वतीने जालना जिल्हा रूग्णालयात कॅन्सरवरील उपचारासाठी केमोथेरपी युनिट मंजूर केले आहे.या कॅन्सर युनिटमध्ये मौखिक कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. या युनिटसाठी लागणा-या औषधांची मागणीही जिल्हा रूग्णालयाच्या वतीने वरिष्ठस्तरावर करण्यात आली आहे. औषधांचा पुरवठा झाल्यानंतर कॅन्सरग्रस्त रूग्णांवर केमोथेरपीद्वारे उपचार केले जाणार आहेत.खासगी रूग्णालयात लाखोचा खर्चमौखिक कॅन्सर, गर्भाशय पिशवीचा कॅन्सर असो अथवा स्तनाचा कॅन्सर; यावरील उपचारासाठी खासगी रूग्णालयात लाखो रूपयांचा खर्च होतो. मात्र, जिल्हा रूग्णालयात सुरू होणा-या केमिओथरपी युनिटमुळे रूग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.डॉक्टरांना प्रशिक्षणजालना जिल्हा रूग्णालयात केमोथेरपी युनिट सुरू होणार आहे. त्यामुळे येथील डॉ. राजेंद्र गाडेकर व एका स्टाफ नर्सला मुंबई येथील टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये उपचार पध्दतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. भविष्यात गरजेनुसार इतरांनाही वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcancerकर्करोगMedicalवैद्यकीयscienceविज्ञानHealthआरोग्य