शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

काळ्या बाजारावर टाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:39 IST

स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे.

जालना : स्वस्त धान्याच्या काळा बाजाराला आळा बसावा, धान्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी जिल्ह्यात स्वस्त धान्याची द्वारपोच वाहतूक केली जात आहे. स्वस्त धान्याची वाहतूक करणा-या ७० वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली असून, दोन महिन्यांत ६४ हजार क्विंटल स्वस्त धान्य दुकानदारांपर्यंत थेट पोहोचविण्यात आले आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य योजनेचे तीन लाख १९ हजार लाभार्थी आहेत, तर रेशन कार्डधारकांची संख्या तीन लाख ५३ हजार आहे. जिल्ह्यातील १२८० विक्रेत्यांमार्फत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप केले जाते. शासनाकडून प्राप्त होणारा तांदूळ, गहू साठविण्यासाठी जालना शहरात अन्न महामंडळाची जिल्हा स्तरावर भोकरदन नाका परिसर व बोरखेडी येथे दोन गोदामे आहेत. या गोदामांतून आठही तालुक्यांतील गोदामांपर्यंत स्वस्त धान्य पोहोचविण्यासाठी यापूर्वी खाजगी वाहनांचा वापर केला जात होता. तालुका स्तरावरील गोदामातून स्वस्त धान्य दुकानदार आपल्या सवडीप्रमाणे न्यायचे. यासाठी त्यांना प्रतिक्विंटल केवळ १९ रुपये वाहतूक खर्च मिळत होता. मात्र, अशा पद्धतीने वाहतूक करताना स्वस्त धान्याचा काळा बाजार होण्याचे प्रकार समोर आले होते. बहुतांश वेळा विक्रेते महिन्याच्या शेवटी गोदामातून धान्य घेऊन जात असल्याने लाभार्थ्यांना या महिन्याचे धान्य पुढील महिन्यात मिळत होते. या सर्व प्रकाराला ब्रेक लावण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने दोन महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्य द्वारपोच वाहतूक यंत्रणा सुरू केली आहे. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात या माध्यमातून ४० हजार क्विंटल गहू व २४ हजार क्विंटल तांदूळ विक्रेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी दिली.