शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

चक्का जाम आंदोलन जिल्ह्याची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:49 IST

मराठा आरक्षणानिमित्त जालना जिल्ह्यात गुरूवारी सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा आरक्षणानिमित्त जालना जिल्ह्यात गुरूवारी सर्वत्र चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मराठा समाज बांधवाचा मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी टायर जाळून निषेध नोंदविण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे चित्र होते.चार ठिकाणी चक्का जामजालना : सकल मराठा समाजा बांधवांकडून गुरूवारी जालना शहरातही मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी अंबड चौफुलीवर चार तास चक्का जाम आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान रूग्णवाहिकेला मात्र रस्ता मोकळा करून दिला जात होता.सकाळी ११ वाजता कन्हैयानगर, चंदनझिरा, मंठा चौफुली आणि अंबड चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त तरूणांनी टायर जाळून सकारच्या वेळकाढू पणाबद्दल तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. जालना शहरात एंट्री करणाऱ्या चारही मार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. चारही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनातील कार्यकर्ते घोषणाबाजी करत असले तरी ती शांततापूर्ण होती. कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात होती. विशेष करून शाळेच्या बसला रस्ता करून दिला जात होता. अंबड चौफुलीवर सर्वात जास्त वेळ म्हणजे चार तास आंदोलन करण्यात आल्याने अंबड जालना मार्गावरील वाहतुकीला याचा मोठा फटका बसला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव दलाची तुकडी देखील तैनात करण्यात आल्याने चारही ठिकाणी आंदोलनाच्या वेळी मोठा बंदोबस्त होता.आंदोलनाची दिशा ठरणारसलग तीन दिवस सकल मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा प्रतिसाद मिळाला. आज जरी हे आंदोलन येथे संपत असले तरी, राज्य पातळीवरील बैठक झाल्यावर त्यात आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आगामी आंदोलन कधी आणि कसे राहील याची कल्पना समाज बांधवांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले. जोपर्यंत आरक्षण देण्या संदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत या ना त्या मार्गाने आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन