शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवालीतील साखळी उपोषण १५ दिवसांनी पुढं ढकलले; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:17 IST

उपोषण सोडताना दिलेल आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे १५ फेब्रुवारी पासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याच जाहीर केले होते.

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) : अंतरवली सराटी येथे उद्या, १५ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या साखळी उपोषणाबाबत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हे उपोषण  दहा-पंधरा दिवसांसाठी पुढं ढकलल्याची घोषणा जरांगे यांनी आज सकाळी केली. ते अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषदेस संबोधित करत होते.

जरांगे पुढे म्हणाले, उपोषण सोडताना दिलेल आश्वासनाची अंमलबजावणी होत नव्हती त्यामुळे १५ फेब्रुवारी पासून अंतरवली सराटी येथे साखळी उपोषण करण्याच जाहीर केले होते. मात्र, काल आम्ही केलेल्या दोन मागण्यांचा शासन निर्णय सरकारने घेतला आहे. शिंदे समितीला मुदतवाढ दिली, गॅझेट लागू करू म्हणून उल्लेख केला आहे. त्यासोबतच सगेसोयरेची अंमलबजावणी करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा वेळ लागणार असल्याच त्यांनी सांगितलं. चार पैकी दोन मागण्या मान्य करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली, त्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. राहिलेल्या दोन मागण्यांची येत्या आठ-पंधरा दिवसात अंमलबजावणी सरकारने करावी, असेही जरांगे यावेळी म्हणाले.

... तर सरकारला सहकार्यसरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं. उलट सरकार काम करत असेल तर सहकार्य केलं पाहिजे, या भूमिकेत राहिले पाहिजे असे मत जरांगे यांनी उपोषण पुढे ढकलल्याच्या निर्णयावर व्यक्त केले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस