शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आडनावावरून ठेवली स्मशानभूमीची नावे; वाचा १५ स्मशाने असलेल्या गावाची कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 17:13 IST

आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत.

ठळक मुद्देअखेरच्या प्रवासाला तरी अडचण नाही ! कथा तब्बल १५ स्मशाने असलेले पिंपळगाव रेणुकाई गावाची  

- फकिरा देशमुख 

भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे स्मशानभूमीचा सुकाळ असलेले जिल्ह्यातील एकमेव गाव ठरले आहे़ तालुक्यात १५७ गावे असून आजही बहुतांश गावांत स्मशानभूमीसाठी साधे टीनपत्र्याचे शेडसुध्दा नाही. मात्र पिंपळगाव रेणुकाई या आठ हजार लोकवस्ती असलेल्या गावात तब्बल पंधरा स्मशानभूमी आहेत. त्यापैकी आठ स्मशानभूमीसाठी बांधकाम करण्यात आले आहे. एक मुस्लिम बांधवांचे कब्रस्तान आहे. सहा ठिकाणी अद्यापही उघड्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत

या गावात अठरापगड जातींचे वास्तव्य असून चांगला एकोपाही आहे. कधीही या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण झालेली नाही.  असे असले तरी या गावात्त जातीपेक्षा आडनावावर स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले आहे.  एकाच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी जि. प.च्या तत्कालीन सभापती वर्षा देशमुख यांनी २०१३-१४ मध्ये देशमुख समाजबांधवांसाठी स्मशानभूमीचे बांधकाम केले.  त्यानंतर चंद्रकांत दानवे यांच्या निधीतून याच समाजासाठी दुसरी स्मशानभूमी बांधली. 

मराठा समाजाच्या पाच स्मशानभूमीमराठा समाजाच्या सास्ते, नरवाडे, आहेर, गावंडे, गाडेकर अशा पाच स्मशानभूमी वेगळ्या आहेत. वाणी, बारी, नाथजोगी समाजाच्या आडनावाप्रमाणे दोन, तर ब्राह्मण, दलित, वडार यांच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत.

२०१०नंतर झाले आडनावाप्रमाणे बांधकाम२०१० पर्यंत कोठेच स्मशानभूमीचे पक्के बांधकाम केलेले नव्हते,  मात्र तत्कालीन जि. प. सभापती मनिष श्रीवास्तव यांनी मराठा समाजासाठी एका स्मशानभूमीचे बांधकाम केले. त्यानंतर जातीपेक्षाही आडनावाप्रमाणे बांधकाम करण्यात आले. या शासनाच्या जागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या नात्याप्रमाणे नागरिक कोणा कुटुंबियाचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार करीत होते. नंतर मात्र चित्र बदलत गेले. सध्या केवळ  वडार व न्हावी समाजासाठी स्मशानभूमी नाही. 

टॅग्स :SocialसामाजिकJalanaजालनाDeathमृत्यू