शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परतूर शहरात शिवजयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:22 IST

शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत लेझीम, गोंधळी, मावळे युवक, युवतींनी बांधलेले भगवे फेटे आणि ढोल ताशांच्या गजरा बरोबरच शांततेचे प्रदर्शन घडले

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : शहरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत लेझीम, गोंधळी, मावळे युवक, युवतींनी बांधलेले भगवे फेटे आणि ढोल ताशांच्या गजरा बरोबरच शांततेचे प्रदर्शन घडले. यामुळे ही शिव जयंती एक आगळी वेगळी ठरली.रेल्वे गेट पासून सकाळी ११ वाजता या शिव जयंतीच्या मिरवणुकीस सुरूवात करण्यात आली. भव्य सजवलेल्या रथावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व पुढे शाळकरी मुला-मुलींचे लेझीम पथक, गोंधळी, मावळे , युवक व युवतींनी बांधलेले भगवे फेटे या मिरवणूकीचे आकर्षण ठरले. शिस्तीचे प्रदर्शन करत ही मिरवणूक पार पडली. नामदेव वायाळ, शंकर थोटे, प्रकाश चव्हाण यांनी पाणी, लिंबू सरबत, फराळाची व्यवस्था मिरवणुकीत सहभागी शिव प्रेमींसाठी केली होेती. शेवटी गाव भागात उत्साहात या शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत पालकमंत्री बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, सभापती कपिल आकात, जि.प. सदस्य राहुल लोणीकर, नितीन जेथलिया, संदीप बाहेकर, अ‍ॅड. जगन बागल, प्रकाश चव्हाण, दीपक कदम, कृष्णा आरगडे, राजेश भुजबळ, बाबा गाडगे, श्रीकांत उन्मुखे, डॉ. संजय पुरी, डी. वाय. काटे सहभागी झाले होते. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल कदम, पांडुरंग नवल, सभाजी तिडके, अशोक तनपुरे, प्रा. भागवत नाईकनवरे, अभय काळुंके, सुनील मगर, सचिन बाहेकर, रमेश सोळंके, संतोष हिवाळे, प्रभाकर दिलीप मगर, विनायक भिसे सहभागी होते.या मिरवणुकीत मुला - मुलींचे लेझीम पथक व युवतींनी भगवा फेटा व वस्त्र परिधान करून सहभाग घेतला. यामध्ये रसिका दिरंगे, विशाखा वायाळ, तेजस्विनी तनपुरे, रोहिणी सुरूंग, जयश्री मगर, स्रेहल बोराडे, शिवानी धुमाळसह अन्य महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीSocialसामाजिक