सोमेश्वर विद्यालयात शिक्षक दिन साजरा
आष्टी : येथील परतूर तालुक्यातील सोमेश्वर माध्यमिक विद्यालय आष्टी येथे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. यू. झरेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. ए.व्ही. अंभुरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच शाळेतील शिक्षक एस. आर. देवडे, व्ही.ए.देवडे, एस.ए. हिंगे, एस.बी. गाढवे, आर. एस. आढे हे उपस्थित होते.
श्रीकांत चिंचखेडकर यांचा सत्कार
जालना : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्रा. श्रीकांत चिंचखेडकर यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना चिंचखेडकर यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीची खंत व्यक्त करत असताना विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात दुरावा निर्माण होत असल्याचे सांगितले. ऋषिकेश राऊत यांनी शिक्षकांप्रती आदर भाव वाढणे अतिशय आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी चंद्रकांत हंडे, ऋषिकेश राऊत, अभिजित रन्नवरे, रोहित आगळे, ऋतिक इंगळे, सागर मांडे, पुष्कर जोशी आदींची उपस्थिती होती.
शिवाजी सांगोळे अध्यक्षपदी
भोकरदन : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या स्थायी समितीद्वारे हिंदी विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी मोरेश्वर महाविद्यालय भोकरदन येथील हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी रामकिसन सांगोळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, संस्थेचे कोषाध्यक्ष आमदार संतोष दानवे, संस्थेच्या अध्यक्षा निर्मला दानवे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन सदस्य किशोर शितोळे, संजय गायकवाड, डॉ. दिवाकर कुलकर्णी आदींनी स्वागत केले.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात
जालना : जालना- मंठा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पारध येथील यात्रा महोत्सव रद्द
भोकरदन : पारध येथे नुकतीच सर्व धर्मीय व राजकीय पक्षांची शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत यात्रा महोत्सव न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी पोळा, गणेशोत्सव, हिंडीबा उत्सव व हिंडीबा उत्सव यावर चर्चा झाली. याप्रसंगी सरपंच कमलबाई सुरडकर, उपसरपंच शेख श्रीवास्तव, माजी सभापती परमेश्वर लोखंडे, शिवा लोखंडे, शिवसेना अल्पसंख्यांक सेलचे तालुका प्रमुख शेख आबेद, समाधान लोखंडे, सपोनि. अभिजीत मोरे आदींची उपस्थिती होती.