शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अस्मानी संकटाचा कहर; गोठ्यावर वीज पडल्याने दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 18:59 IST

महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला.

ठळक मुद्दे शेतकऱ्याचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावर

आव्हाना (जि. जालना) : वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, आठ शेळ्यांसह ३० कोंबड्या जळून खाक झाल्या. ही घटना भोकरदन तालुक्यातील दगडवाडी शिवारात शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

दगडवाडी येथील हिंमतराव पांडे यांचे गावच्या शिवारात शेत आहे. पांडे यांनी शुक्रवारी रात्री शेतातील गोठ्यात चार बैल, १० शेळ्या बांधल्या होत्या. या गोठ्यातच ३० गावरान कोंबड्यांसह इतर शेती उपयोगी साहित्य होते. या गोठ्यावर शनिवारी पहाटे अचानक वीज पडली. वीज पडल्याने गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैल, ८ शेळ्या व ३० कोंबड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेती उपयोगी साहित्यही जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर दोन बैलं आणि दोन शेळ्यांना गोठ्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, तेही गंभीर होरपळले आहेत. 

घटनेची माहिती मिळताच माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रा. अंकुश जाधव यांना घटनास्थळास भेट देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच महसूल व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेत घटनास्थळीच पंचनामा करण्यात आला. या घटनेत हिंमतराव पांडे यांचे जवळपास ३ लाख ८० हजार रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद पंचनाम्यात करण्यात आली आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यावर आस्मानी संकट कोसळले असून, प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ अधिकाधिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकरी कुटुंबाला अश्रू अनावरवीज पडल्याने लागलेल्या आगीत जनावरे जळून खाक झाल्याची माहिती समजताच पांडे कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बैल, शेळ्यांसह कोंबड्यांची झालेली राख पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. पांडे कुटुंबिय बैलांसह इतर जनावरांचा सांभाळ मोठ्या प्रेमाने करीत होते. त्यांचा मुलगा सतीश हा बैलांचा संभाळ करण्यावर आघाडीवर असायचा. मात्र, त्याच बैलांचा आगीत मृत्यू झाला होता. त्यामुळे त्याचेही अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीfireआगJalanaजालना