शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळी प्रादुर्भाव प्रकरणी जालन्यात 'महिको' विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:46 IST

जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा ...

ठळक मुद्दे 'बोलगार्ड' कालबाह्य तंत्रज्ञान झाल्याचा निष्कर्ष  जिल्ह्यातून जवळपास १ लाख शेतक-यांनी जिल्हा गुण नियंत्रक कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या.

जालना : कपाशीवरील बोंडअळीच्या प्रादुर्भाव प्रकरणी महाराष्ट्र हायब्रीड सीड्स अर्थात महिको विरुद्ध जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा गुणवत्ता नियंत्रक सयप्पा गरंडे यांनी ही तक्रार दिली. 

जालना जिल्ह्यात यावर्षी २ लाख ७८ हजार हेक्टरवर कपाशीचे पिक घेण्यात आले होते. यासाठी शेतक-यांनी 'महिको' कंपनीचे बियाणे वापरले होते. मात्र, बोंडअळीने जिल्ह्यातील संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्ह्यातून जवळपास १ लाख शेतक-यांनी जिल्हा गुण नियंत्रक कार्यालयात तक्रारी दिल्या होत्या. यात बदनापूर तालुक्यातून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 

बोलगार्ड तंत्रज्ञान कालबाह्ययाची दखल घेत याबाबत जिल्हा स्तरीय समितीने प्रादुर्भाव झालेल्या भागाची पाहणी केली. पाहणीत बोंडअळीमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे आढळून आले. तसेच 'महिको' कंपनीचे 'बोलगार्ड' हे तंत्रज्ञान कालबाह्य झाले असल्याचे निदर्शनास आले. हे तंत्रज्ञान वापरल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचा निष्कर्ष निघाला अशी माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रक सयप्पा गरंडे यांनी सांगितले.  महिको कंपनीचे बियाणे वारल्याने हजारो एकरवरील पिकाचे नुकसान झाले. यातून शेतक-यांची फसवणूक झाली असल्याने 'महिको' कंपनी विरुद्ध कापूस बियाणे अधिनयम 2009 व् भादवी 420 व् 427 नुसार बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :cottonकापूसJalanaजालनाFarmerशेतकरी