शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कार कालव्यात कोसळण्यापासून बचावल्याने अनर्थ टळला; वडीगोद्रीजवळ भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:56 IST

धुळे-सोलापूर महामार्गावर अपघातांची मालिका कायम; कार कालव्यात कोसळल्यापासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला असून ८ प्रवासी जखमी आहेत

- पवन पवारवडीगोद्री (जालना):छत्रपती संभाजीनगरहूं देवदर्शनासाठी पंढरपूरकडे निघालेली कार वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्यावरील पुलाच्या कठड्याला धडकली. ही घटना चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडली असून, या अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. सुदैवाने, कार कालव्यात कोसळण्यापासून वाचली आणि एअर बॅग उघडल्यामुळे चालक व समोरील प्रवासी गंभीर जखमांपासून बचावले.

अपघातग्रस्त कार (एमएच २० जीई ३७२३) छत्रपती संभाजीनगर येथून निघून पंढरपूरकडे जात होती. धुळे-सोलापूर महामार्गावरून जाताना वडीगोद्री उड्डाण पुलावरून खाली उतरताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट डाव्या कालव्याच्या पुलावर जाऊन आदळली. कार कालव्यात कोसळल्यापासून बचावल्याने मोठा अनर्थ टळला. कारमधील ८ प्रवासी एअर बॅग वेळीच उघडल्याने सुखरूप आहेत. धुळे-सोलापूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असून, निष्काळजीपणा, भरधाव वेग आणि वाहनावर नियंत्रण नसणे ही प्रमुख कारणे ठरत आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे:हौसाबाई हरिश्चंद्र तांबे (वय ७०), विष्णू हरिश्चंद्र तांबे (वय ५५), सरला विष्णू तांबे (वय ४०), वैभव विष्णू तांबे (वय १८), वृषाली विष्णू तांबे (वय १७) - सर्वजण डोणगाव तांबे, छत्रपती संभाजीनगर येथील, कौशल्याबाई भीमराव जाधव (वय ७०), कडेठाण, मीरा रमेश लहाने (वय ४०), प्रीती रमेश लहाने (वय १९), दोघी घारेगाव रहिवासी 

दरवाजे फोडून जखमींना बाहेर काढलेअपघात घडल्यानंतर वडीगोद्री येथील ग्रामस्थांनी तत्परतेने मदतकार्य करत दरवाजे फोडून जखमींना बाहेर काढले. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्रातून दोन रुग्णवाहिकांच्या साहाय्याने त्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरJalanaजालनाAccidentअपघात