शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोडी केली नाही अन् पैसेही परत दिले नाहीत; संतापून मुकादमाने केले कामगाराचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 12:25 IST

कामगार ऊसतोडीसाठी गेला परंतु ऊसतोडी न करता परत गावाकडे आला.

जालना : झालेल्या करारानुसार कामगाराने ऊसतोडी केली नाही, तसेच मुकादमाकडून घेतलेले पैसे परत न केल्यामुळे एका ऊसतोड कामगाराचे पाच जणांनी अपरहण केल्याची घटना अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्यावर शनिवारी दुपारी घडली. संतोष निवृत्ती मगरे (रा. चिंचखेड, ता. अंबड, ह.मु. पुणे) असे अपहरण झालेल्या कामगाराचे नाव आहे, अशी माहिती सपोनि. इंगळे यांनी दिली.

संशयित मुकादम देवीदास राठोड, विकास पवार, विनोद राठोड, (सर्व रा. पिंपरखेड), पंडित शेषराव चव्हाण, गणेश शिवदास राठोड (रा. राहुवाडी, ता. अंबड) यांनी संतोष मगरे यांना ऊसतोडीसाठी आगाऊ पैसे दिले होते. त्यानुसार ते पुणे येथे ऊसतोडीसाठी गेले; परंतु ऊसतोडी न करता ते परत गावाकडे आले. त्यांना देवीदास राठोड यांनी वारंवार पैशांची मागणी केली; परंतु ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे पाचही संशयित संतोष मगरे यांना वारंवार शिवीगाळ करून मारहाण करीत होते. शनिवारी दुपारी मगरे हे अंबड तालुक्यातील चिंचखेड फाट्यावर चहा पीत होते. दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पाचही संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर मगरे यांना क्रूझर गाडीत बसून घेऊन गेले. याची माहिती नातेवाइकांनी अंबड पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. दरम्यान, याप्रकरणी निवृत्ती हरिभाऊ मगरे यांच्या फिर्यादीवरून पाचही संशयितांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना