शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो दिसतो का? हाकेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:22 IST

बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.

- पवन पवारवडीगोद्री (जालना) : प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी, ९६ कुळ्यांची भाषा करायची आणि आम्ही मागास असल्याचं म्हणायचं. आरक्षण मागणाऱ्या जरांगेंच्या बॅनरवर फुले-शाहू-आंबेडकरांचा फोटो लागलेला दिसतो का? असा सवाल करत बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन करणाऱ्या जरांगे यांनी त्यांच्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाकावे अशी जहरी टिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली.

मनोज जरांगे शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून लोकप्रतिनिधींना शिव्या देतात. त्यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हाव यासाठी शुभेच्छा. तरी जस्टीस रोहिणी आयोगाच्या जजमेंटप्रमाणे जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासलेपण सिद्ध करू शकत नाही. तोपर्यंत जरांगेच काय, शरद पवार जरी आले तरी ओबीसीचे आरक्षण संपू शकत नाही. जरांगेंच्या सांगण्यावरून जीआर काढणार असाल तर ओबीसींचे सुद्धा जशासतसे उत्तर असेल, असा इशारा हाके यांनी सरकारला दिला. तसेच बिग बॉसच्या लोकांना माझी मागणी, जरांगेंना तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या, यापेक्षा जरांगेंची लायकी नाही, असा सणसणीत टोला हाके यांनी लगावला.

हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची शासनाची हालचाल सुरू आहे. हा अधिकार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी दिला मुख्यमंत्र्याला कायदा कळतो का? जरांगे तमाशातला सोंगाड्या आहे, या माणसाच्या सांगण्यावरून जीआर काढण्याची तयारी करतात, याचे मुख्यमंत्री यांना काही वाटत नाही का? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण या माणसांना अंतरवली सराटीला जायला वेळ आहे आणि ओबीसीच्या एकही आंदोलकाकडे जायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका हाके यांनी केली.

जरांगे हे केवळ तमाशातला बताशा : नवनाथ वाघमारे जरांगे हे केवळ तमाशातला बताशा, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं राज्यातील 57 लाख बोगस कुणबी नोंदी रद्द करू, SIT ची चौकशी केली  नाही, मुख्यमंत्री मराठ्यांच्या हैदराबाद गॅझेट बाबत आम्ही सकारात्मक आहोत असं बोलत असतील तर नक्कीच आम्हाला आरक्षण वाचवण्यासाठी आमचा हक्क वाचवण्यासाठी आम्हाला जशास तसे उत्तर द्यावं लागेल. राज्यातल्या जातीवादी मुख्यमंत्र्याला जशास तसे उत्तरच कळत असेल तर उपोषणाचा उत्तर आम्ही उपोषणानेच देत आहोत. हैद्राबाद गॅझेट नावाचे एक नवीनच गाजर काढला असून ते गाजर जर लागू केलं तर ओबीसी समाजाचा नुकसान होईल, ते होऊ नये म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहोत,आमच्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत राज्यसरकार सांगत नाही आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार नाही , सगे सोयरे कायदा करणार नाही असे सांगत नाही तोवर उपोषण सुरू राहणार आहे.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलlaxman hakeलक्ष्मण हाकेOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना