फोटो
जालना : हमारे गाव की तरफ काम नही था. इसलिए हम सब दोस्त तडेगाव के पास काम को आये थे. हमे मेरे भाईके चार साल के लडके को देखणे जाना था. लेकिन शुक्रवार का दिन हम लोगो के लिए काला दिन राहा. मैने भाई के साथ दोस्तो को गवाय हे सांगताना माधव डावर यांचे डोळे पानावले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदेखड राजा - मेहकर मार्गावरील तडेगाव फाट्याजवळ शुक्रवारी मजुराला तडेगाव येथील कॅम्पमध्ये घेऊन जाणाऱ्या टिप्परला अपघात झाला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे. यातील सर्व जखमींना जालना येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी अपघातील मयतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला.
या घटनेमुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. यात आपल्या सख्ख्या भावाला गमवलेल्या माधव डावर यांनी रडत रडत सांगितले की, आमच्या कुटुंबात सहा जण राहतात. मलाही एक हात नाही. माझ्या भावाचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. त्याला चार महिन्यांपूर्वी मुलगा झाला. त्याला पाहण्यासाठी आम्हाला गावाकडे जायचे होते. त्याची तयारीही आम्ही केली होती. परंतु, शुक्रवारी सकाळी काळाने घात केला अन् मी भावासह माझ्या मित्रांना गमवाले आहे. पोट भरण्यासाठी आम्ही हजारो किलोमीटरवरून येथे आलो होतो. परंतु, देवाने आमच्यावर ही वेळ आणली आहे, असल्याचे सांगताच त्यांना रडू कोसळले. माझा हात तुटलेला आहे. तरीही मी काम करीत होतो. माझा भाऊ होता तेव्हा आम्ही दर महिन्याला पैसे पाठवत होतो. आता माझ्या तुटपुंज्या पगारीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असेही ते म्हणाले.
दोन सख्या भाऊ ठार
या अपघातात दीपक डावर व सुनील डावर हे दोन सख्खे भाऊ ठार झाले आहे. त्यातील सुनिल डावर यांचा विवाह झाला असून, त्यांना दोन मुले आहेत. एकाच घरातील दोन मुले गेल्याने त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला असल्याचे येथील मजुरांनी सांगितले.
सात तासानंतरही शवविच्छेदन नाही
अपघात घडल्यानंतर तडेगाव येथील ग्रामस्थांसह इतर लोकांनी सर्व जखमींना वाहनांद्वारे ११ वाजेच्या सुमारास जालना येथे पाठविले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून १३ जणांना मयत घोषित केले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदन कक्षात ठेवण्यात आले. मात्र, सात तासानंतरही शवविच्छेदन करण्यात आले नाही. त्यामुळे हजारो किलोमीटर मृतदेह कधी न्यावे, असा सवाल नातेवाईकांनी केला आहे.