शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या मतदारसंघातच पीकविमा वाटपात गोंधळ -कैलास गोरंट्याल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 01:08 IST

कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पालिकेच्या मुद्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी घेतलेला पवित्रा हा हास्यास्पद आहे. कर आकारणीच्या मुद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचा दावा गोरंट्याल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या मतदारसंघात पीकविमा वाटप रखडल्याचे सांगून त्यांनी शहरात साडेचार वर्षात औरंगाबाद चौफुली ते विशाल कॉर्नर या एकमेव रस्त्याचे काम केल्याचेही गोरंट्याल यांनी सांगितले.गेल्या दोन महिन्यांपासून जशा विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसे राज्यमंत्री खोतकर तसेच उपनगराध्यक्ष राऊत यांच्याकडून आम्हाला लक्ष्य केले जात आहे. ही बाब चिंतेचा विषय आहे. त्यांनी कुठल्याही चौकशी केल्या तरी त्यांना त्यात काहीच हाती लागणार नाही, अंदाज समितीचा अहवाल त्यांनी जनतेसमोर मांडवा असे आवाहन यावेळी करण्यात आले. कर आकारणीची कोलेब्रो कंपनीची नियुक्ती ही शिवसेना -भाजप युतीच्या ताब्यात पालिका असतानाच करण्यात आली होती. असा दावा करून त्याला आम्ही मुदतवाढ दिली. पालिकेचे उपत्न वाढीचे स्त्रोत हे कर आणि पाणी पट्टी आकारणी हेच असल्याने ते काळानुरूप वाढविणे गरजेचे असल्यानेच आम्ही हा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निर्णयाची कल्पना आम्हाला नव्हती हे देखील गोरंट्याल यांनी मान्य केले.एकूणच गणेश विसर्जनच्या मुद्यावरून ही पत्र परिषद थेट खोतकर आणि राऊत यांच्या भोवती फिरली. यावेळी आपण अनेक गावात फ्रिलो असता, शेतकऱ्यांचे मोठे हाल आहेत. पीकविमा, पीककर्ज हे अद्यापही अनेकांना मिळाले नाही. जालना तालुक्यात तर गेल्या रबी हंगामातील पीकविमाही वाटप झालेला नाही. याकडे राज्यमंत्र्यांनी लक्ष देणे अपेक्षित आहे. परंतु तसे करता केवळ कामाच्या शुभारंभावर भर देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नाहीत, तसेच अन्य शासकीय विभागात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. हे शासन म्हणून त्यांनी पाहणे आवश्यक असतसाना नोकरी मेळावा, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम घेऊन ते विकास कामे करत असल्याचे भासवत असल्याचा आरोपही गोरंट्याल यांनी केला. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, शहराध्यक्ष शेख महेमूद, महावीर ढक्का आदींची उपस्थिती होती.गुरूवारी होणा-या गणेश विसर्जनासाठी जालना पालिकेने योग्य ती तयारी केली आहे. यंदा नांदेड येथून ४० जणांचे विशेष पथक तराफ्यांसह तैनात करण्यात आले आहे. तसेच पट्टीचे पोहणारे तरूणही तेथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अग्निशमन दल, क्रेन तसेच घरगुती गणपती विसर्जनाची वेगळी व्यवस्था केली आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, मोठे क्रेन मागवण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजविले असून, विसर्जन स्थळावर १५ सीसीटीव्हीचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.- संगीता गोरंट्याल, नगराध्यक्षा

टॅग्स :Jalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्षPoliticsराजकारण