शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या तिघांचा पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 00:49 IST

अनुसूचित जमातीच्या बनावट प्रमाणपत्राधारे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : अनुसूचित जमातीच्या बनावट प्रमाणपत्राधारे अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणाऱ्यांचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तिघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नागेवाडी येथील रहिवासी अंकुश वेताळ याने गावातील अनिल तिरुखे आणि अन्य तिघा जणांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद चंदनझिरा पोलिसात दिली होती. यावरुन चौघाजणांविरुध्द मारहाण करून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जातीचा पुरावा म्हणून फिर्यादीने आईचे जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. त्यामुळे त्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत ढवळे यांच्याकडे होता. गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सदर गुन्ह्यातील तपास सुरू असताना १३ मार्च २०१५ रोजी गुरन ५/१५ कलम ३२६, ३२४, ३२३, ५०६, ३४ भा. द .वि नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयामध्ये भिल्ल जातीचा पुरावा म्हणून आपल्या आईचे नावाचे प्रमाणपत्र दिले होते. व स्वत:चे प्रमाणपत्र काढले नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते, व स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी वेळ मागितला होता, सदर गुन्ह्याचा तपास हा त्यावेळेचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे होता, या बाबीची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे जातीच्या प्रमाणपत्राची मागणी करता ते मिळाले नसल्याचे सांगून परत पुरावा म्हणून आपल्या आईचे जात प्रमाणपत्र दिले होते.२०१५ पासून अंकुश वेताळ याने आपले जातीचे प्रमाणपत्र काढले नसल्याने त्याच्याविरुध्द पोलिसांचा संशय बळावला. त्याची गुप्त माहिती काढली असता तो आदिवासी समाजाचा नसल्याची खात्री झाली.अंकुश वेताळ याने जातीचा कागदपत्राचा खुलासा सादर करू न शकल्याने त्याच्या विरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत ढवळे यांच्या आदेशाने चंदनझिरा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे श्निवारी २३ फेबु्रवारी रोजी प्रमोद बोडले यांच्या फिर्यादीवरुन अंकुश वेताळ, त्याला मदत करणारी त्याची आई, कार्तिक वाकळे यांच्या विरुध्द फसवणूक केल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक सुनील इंगळे तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalna Policeजालना पोलीस