शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे दागिने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 01:13 IST

मंठा पोलिसांनी गुरूवारी दुपारी दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचे दागिने जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मंठा तालुक्यातील केंधळी पोखरी येथे बुधवारी दुपारी चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा दीड लाखाचा ऐवज लंपास केला होता. मंठा पोलिसांनी गुरूवारी दुपारी दोघांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील चोरीचे दागिने जप्त केले.मंठा तालुक्यातील केंधळी पोखरी येथील सदाशिव माखनराव केंधळे हे बुधवारी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. तर त्यांची आई जळण आणण्यासाठी बाहेर गेली होती. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराच्या पाठीमागील भिंतीवरून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटाचे दार तोडून आतील एक लाख रूपये किंमतीचे दागिने, रोख ४५ हजार रूपये असा एकूण १ लाख ४५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती रात्री उशिरा मंठा पोलीस ठाण्यात देण्यात आली.या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक, फ्रिंगर प्रिंट पथकाला बोलाविण्यात आले. श्वासनाने घटनास्थळापासून एका संशयिताच्या घरापर्यंत माग काढला. पोलिसांनी संशयित म्हणून भागवत भिकाजी लिमकर, विष्णू काशीनाथ घेंबड (दोघे रा. केंधळी पोखरी) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करीत त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने जप्त केले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानदेव बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि विलास निकम, पोउपनि नितीन गट्टूवार, पोकॉ कातकडे, पोकॉ गायके आदींनी केली. यात श्वान पथक व ठसेतज्ज्ञांची मदत झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकjewelleryदागिने