शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पीआरकार्ड नसतानाही बांधले बंगले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 01:04 IST

हातील शिवनगर समोरील भागात सर्व्हे क्रमांक ४९२ चा मोठा परिसर आहे. या परिसरातील नागरिकांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जागा खरेदीकरून त्यावर मोठमोठी घरे बांधली आहेत. मात्र, या नागरिकांकडे भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येणारे पीआरकार्ड नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहातील शिवनगर समोरील भागात सर्व्हे क्रमांक ४९२ चा मोठा परिसर आहे. या परिसरातील नागरिकांनी गेल्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी जागा खरेदीकरून त्यावर मोठमोठी घरे बांधली आहेत. मात्र, या नागरिकांकडे भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येणारे पीआरकार्ड नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. या भागात मंजूर झालेला डांबरी रस्ताही संबंधित कंत्राटदार बिल निघेल की, नाही यामुळे तो पूर्ण करत नसल्याचे वास्तव आहे.गेल्या काही वर्षांपूर्वी शहरातील या अत्यंत महत्वाच्या भागात अनेकांनी केवळ बाँडवर जागा खरेदी करून त्यावर घरे बांधली आहेत. या भागातील नागरिकांनी यापूर्वीही पीआरकार्ड मिळावे म्हणून भूमिअभिलेख तसेच नगररचना कारांकडे अर्ज दिले आहेत. मात्र, त्याची दखल न घेतल्याने एवढी गुंतवणूक करून बांधलेली घरे जर अडचणीत येत असतील ही बाब गंभीर आहे. विशेष म्हणजे जालना पालिका देखील या नागरिकांकडून अद्याप मालमत्ता करही वसूल करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.परिसरातील रहिवाशांनी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदनही दिले आहे. मात्र, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.या संदर्भात येथील नगररचानाकार पवार यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, ज्या जागेवर या नागरिकांनी घरे बांधली आहेत, ती जागा सरकारी असावी, तसेच जर ती तशी असेल तर या नागरिकांनी महसूल विभागाकडून ती नियमाकुल करून घेऊन जो दंड आहे, तो भरल्यावरच ही जागा नियमित होईल. त्यानंतर त्याची नोंद जालना पालिकेकडे होऊन त्यांना घरबांधणीची परवानगी घेतल्यावरच पीआरकार्ड मिळू शकतील. त्यासाठी त्यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगHomeघर