शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पोळ्याच्या मिरवणुकीला काही तास बाकी असतानाच सर्जाराजाचा करुण अंत; शेतकऱ्याचा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 17:25 IST

आपल्या डोळ्यासमोर लाडक्या बैलजोडीचा अंत झाल्याने शेतकऱ्याने खदाणीत टाहो फोडला होता.

- दिगंबर गुजरकुंभार पिंपळगाव (जि.जालना): धन्याच्या शेतात वर्षभर राबलेल्या जोडीला सजवून गावभर मिरवण्याची वेळ जवळ येत असताना घनसावंगी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या दोन्ही बैलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी अंत झाला. विशेष बाब म्हणजे शेतकरी या बैलांना धुण्यासाठी या खदाणीत घेऊन आला होता. पाेळा सण साजरा करण्यासाठी काही तास उरलेले असताना डोळ्यासमोर बैलजोडीचा मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने जीवाच्या आकांताने मोठमोठ्याने टाहो फोडला होता.

घनसावंगी तालुक्यातील घोंशी बु. येथे ही दुखद घटना घडली. येथील शेतकरी सीताराम आव्हाड हे पोळ्यासाठी आपल्या बैलजोडीला सजवण्याआधी त्यांना धुण्यासाठी गावालगत असलेल्या खदाणीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास घेऊन गेले होते. घोंशी गावापासून ही खदाण एक किलोमीटर अंतरावर होती. दोन्ही बैल पाण्यात उतरल्यानंतर त्यातील एका बैलाच्या पायात कासरा अडकल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्यांना वाचविण्यासाठी शेतकरी सीताराम आव्हाड यांनी आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना बोलावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणी मदतीला येईपर्यंत त्यांच्या दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

आपल्या डोळ्यासमोर लाडक्या बैलजोडीचा अंत झाल्याने शेतकऱ्याने खदाणीत टाहो फोडला होता. आपल्या सर्जा-राजाची जल्लोषात मिरवणूक काढण्याऐवजी त्यांना शेवटाचा निरोप देण्याची वेळ शेतकरी आव्हाड यांच्यावर आल्याने त्यांना दु:ख अनावर झाले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

बैल जोडीचा होता कुटुंबाला आधार शेतकरी सीताराम आव्हाड यांना दोन एकर जमीन आहे. या बैलजोडीच्या मदतीने ते आपल्या शेतीबरोबरच दुसऱ्याच्या शेताची मशागत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु, दोन्ही बैलाच्या मृत्यूमुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रJalanaजालना