शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाण्याच्या वारकरी युवकाचा जालन्यात दगडाने ठेचून निर्घुण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:25 IST

भोकरदन तालुक्यातील पारध शिवारात आढळला मृतदेह

ठळक मुद्देमृताच्या खिशात आढळली रोख रक्कम दगड आणि लाकडाने ठेचून केली हत्या

पारध (जालना ) : एका २४ वर्षीय युवकाचा दगड, लाकडी फळीने ठेचून खून केल्याची घटना पारध (ता.भोकरदन) शिवारात घडली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आली असून, या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत युवक हा मासरूळ (जि.बुलढाणा) येथील आहे.

पारध येथील प्रभू दामू सुरडकर हे शुक्रवारी सायंकाळी शेतातून घरी येत होते. त्यावेळी श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतातील बांधावरील एका झाडाखाली त्यांना एका युवकाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तात्काळ पारध पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली. पो.ना. नारायण माळी, प्रकाश सिनकर, पो.हे.कॉ. गीते यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. त्यानंतर भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाय, स.पो.नि. शंकर शिंदे, पो.ना. प्रकाश सिनकर, गणेश पायघन, रामेश्वर सिनकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

मयताजवळ असलेल्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर मयताचे नाव स्वप्नील श्रीरंग भुते (वय-२४ रा. मासरूळ ता.जि.बुलढाणा) असल्याचे समोर आले. पंचनाम्यानंतर वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात मयताच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोना नारायण माळी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मारेकऱ्याविरूध्द पारध पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच मारेकऱ्यांना जेरबंद करू, असे सपोनि शंकर शिंदे म्हणाले.

चार संशयित ताब्यातस्वप्नील हा शुक्रवारीच पंढरपूरच्या वारीवरून घरी परतला होता. दुपारी दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्याला प्रवेशासंबंधी बोलण्यासाठी घराबाहेर नेले होते अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. तसेच त्याच्या खिशातून रोखरक्कम आढळून आल्याने हा खून चोरीच्या उद्देशाने नसल्याचा कयास आहे. दरम्यान, पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJalanaजालना