शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
3
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
4
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
5
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
7
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
8
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
9
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
10
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
11
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
12
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
13
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
14
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
15
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
16
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
17
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
18
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
19
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
20
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मुलाची सुधारगृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 20:17 IST

पोलिसांनी सखोल तपास करून विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. 

ठळक मुद्देसात वर्षीय अल्पवयीन मुलीला विधिसंघर्षग्रस्त मुलाने अमरावती येथून पळवून आणले.

जालना : अमरावती येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी विधि संघर्षग्रस्त मुलाचा गुन्हा सिद्ध झाल्याने त्याची रवानगी मुंबई येथील बाल सुधारगृहात करण्याचे आदेश बाल न्यायमंडळाचे अध्यक्ष वसंत यादव यांनी दिले.

सात वर्षीय अल्पवयीन मुलीला विधिसंघर्षग्रस्त मुलाने अमरावती येथून पळवून आणले. हिवताप व पायाच्या जखमेवर उपचार करण्यासाठी पीडित मुलीला मारहाण करून अत्याचार केला असल्याची बाब वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदरची बाब कदीम जालना पोलिसांना कळविली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीचे जबाब नोंदवून या प्रकरणात विधि संघर्षग्रस्त मुलाविरूद्ध फिर्याद नोंदविली. 

या प्रकरणी अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून आणणे, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे या गुन्ह्यासाठी कलम ३७६ (२), (१), ३७६ (२), ३६३, ३६६-अ सह कलम ४, ८ बाललैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, सहायक पोलीस निरीक्षक निशा बनसोड यांनी सखोल तपास करून विधिसंघर्षग्रस्त मुलाविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. 

या प्रकरणात पीडित मुलीचे जबाब पोलिसांनी नोंदविला. एकूणच युक्तिवाद ऐकल्यानंतर विधिसंघर्षग्रस्त मुलाविरूद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने ३७६ (२), ०९. ३६३, ३६६ अ भादंवि अन्वये गुन्हा सिद्ध झाल्याने विधिसंघर्षग्रस्त मुलाची रवानगी मुंबई येथे करण्याचे आदेश जालना येथील बाल न्याय मंडळाचे अध्यक्ष वसंत यादव यांनी दिले. या प्रकरणात अ‍ॅड. राजकमल ओव्हळ, रमेश जोगदंड यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :Rapeबलात्कारJalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी