शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोगस बियाणांचा कारखाना उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:53 IST

बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उद्ध्वस्त केला.कारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उद्ध्वस्त केला.कारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती गुरुवारी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग सुरुवातीपासून बनावट बियाणे विक्री होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहे. जालना शहरातील कचेरी रोड भागात बनावट बियाणे विक्री व पॅकिंग होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना मिळाली होती. या आधारे कृषी व पोलीस विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा कचेरी रोड भागातील कल्पेश शांतिलाल टापर याच्या राहत्या घरी छापा टाकला. या ठिकाणी आरआरबीटी कपाशी बियाण्याचे पाकिटे, खुले बियाणे, तसेच भेंडी, मिरची, टरबूज, भोपळा, वांगे, कांदा या भाजीपाला पिकांचे खुल्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे आढळून आले. येथे रासायनिक प्रक्रिया व रंग देऊन नामांकित कंपनीचे लेबल्स वापरून खरे वाटतील, असे बियाणे तयार केले जात होते. चारशे रुपयांच्या पाकिटावर हजार रुपयांपर्यंत बनावट किंमतही टाकली जात होती. पथकाने सर्व बियाणे, पॅकिंग उपकरणे जप्त केली. चौकशीत टापर याने बाबासाहेब प्रल्हाद वाडेकर (रा. जामवाडी), हरिदास बाजीराव निहाळ (रा.चनेगाव) यांना बनावट बियाणे विक्री केल्याचे सांगितले. पथकाने दोघांना राहत्या घरातून ताब्यात घेत घरातील बनावट आरबीटी कपाशी बियाण्याचा साठा जप्त केला. कारवाईत एकूण ६४ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांवर कदीम पोलीस ठाण्यात फसवणूक, बियाणे अधिनियम, आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.लोकमत इफेक्ट : पोलीस व जिल्हा कृषी विभागाची कारवाईपोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन, पो.नि. निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, जिल्हा गुणनियंत्रक सायप्पा गरांडे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कमलाकर अंभोरे, सुरेश गिते, भालचंद्र गिरी, तुकाराम राठोड, सॅम्युअल कांबळे, फुलसिंग घुसिंगे, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, समाधान तेलंग्रे, मदन बहुरे, रंजित वैराळ, सोमनाथ उबाळे, किशोर जाधव, योगेश जगताप, पठाण, एस.व्ही. कराड, पी.स. कदम, आर. एल.तांगडे, आर.जे. बोडके यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस