शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रात वाहून गेलेल्या ‘त्या’ युवकाचा मृतदेह आढळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 01:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू शिवारातील गिरजा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा बुधवारी सकाळी मृतदेह आढळून ...

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू शिवारातील गिरजा नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा बुधवारी सकाळी मृतदेह आढळून आला. दरम्यान, गिरजा नदीपात्रात अवैधरीत्या बेसुमार वाळूचा उपसा झाल्याने गत पंधरा दिवसात तिघांचा बळी गेला आहे.बोरगाव तारु येथील गिरजा नदीच्या पाण्यात मंगळवारी सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक वाहून गेला होता. प्रशासकीय पथकासह ग्रामस्थांनी शोध मोहीम राबविली. मात्र, त्याचा काही शोध लागला नव्हता. बुधवारी सकाळी गावातील ग्रामस्थांनी बोटीच्या सहाय्याने शोध घेत्यानंतर सोमीनाथ याचा मृतदेह सापडला. केदारखेडा आरोग्य केंद्रात डॉ. संदीप घोरपडे, डॉ. सुधाकर लटपटे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर बोरगाव तारु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई- वडील, दोन भाऊ, दोन बहीण असा परिवार आहे. शोध मोहिमे दरम्यान प्रशासनाचे कर्मचारी, सरपंच माधवराव हिवाळे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले.गिरजा व पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. त्यामुळे नदीपात्रात खड्डे पडले आहेत. पात्रात उतरल्यानंतर पाणी असल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि संबंधित व्यक्ती वाहून जातो किंवा बुडून मयत होतो. मागील पंधरा दिवसांत या दोन्ही नदीपात्रात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. दहा दिवसांपूर्वी तडेगाव येथील पूर्णा नदीच्या पाण्यात दोघे वाहून गेले होते. तर गतवर्षी केदारखेडा येथे वाळूच्या खड्ड्यात असलेल्या पाण्यात एकाचा मृत्यू झाला होता. तसेच बोरगाव तारू येथील युवकालाही प्राण गमविण्याची वेळ आली आहे. अवैध वाळू उपशाकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळेच हे बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूriverनदीdrowningपाण्यात बुडणे