शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

संत महंतांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही रणसंग्रामात उतरणार- अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:38 IST

संत महंताचे आशीर्वाद घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : संत महंताचे आशीर्वाद घेऊनच आम्ही आगामी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले.परतूर येथे माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांच्यातर्फे रामकथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कथेचा गुरुवारी समारोप करण्यात आला. यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले की, आज रामक थेचा समारोप व माजी आ. सुरेश जेथलिया यांचा वाढदिवस हा दुग्धशर्करा योग आहे. आमचे स्व. पिता शंकरराव चव्हाण यांचे व संतांचे नात जिव्हाळ्याचे होते. आम्ही ते टिकवल. आगामी काळात ते अधिक दृढ होईल. संत महंतांनी दाखवलेला आमचा मार्ग आमचा राजमार्ग व्हावा. राजकारणात चढउतार येतच असतात. तसेच विदर्भ आणि मराठवाडा वेगळा नाही, मराठवाडा ही संताची भूमी आहे, तर विदर्भालाही संतांच्या विचाराची जोड असून, आम्ही संतांच्या आशिर्वादाची शिदोरी घेवूनच पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अंजली जेथलिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी खा. एकनाथ गायकवाड, माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, मंजुषा देशमुख, राजेंद्र राख, सभापती कपील आकात, अ‍ॅड. अन्वर देशमुख, विजय राखे, रमेश सोळंके, नितीन जेथलिया यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आगामी आमदार सुरेश जेथलिया- खा. चव्हाणयावेळी खा. अशोक चव्हाण म्हणाले की, आगामी आमदार सुरेश जेथलिया हे राहणार आहेत. त्यांच्या मागे उभे राहा. शेवटी तुमच्याच हातात आहे. जनतेचे आशीर्वाद व पे्रम त्यांच्या सोबत आहे, असेही खा. चव्हाण म्हणाले.लोकसंग सोडला नाही- जेथलियासुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, मी राजकारणी आहे, मात्र धार्मिकता आणि लोकसंग सोडला नाही. आपला विश्वास व पे्रम असेच कायम ठेवा. तो सार्थ करून दाखवू अशीही ग्वाही याप्रसंगी दिली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणReligious programmeधार्मिक कार्यक्रम