शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

बदनापूर मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळ फुलले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 01:59 IST

अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : अनेकांच्या भविष्यवाणीला चकवा देत भाजपचे उमेदवार नारायण कुचे यांनी बदनापूर विधानसभा मतदार संघात दुसऱ्यांदा कमळ फुलविले. महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा कुचे यांच्या कामी आली असून, भोकरदन तालुक्यातूनही कुचे यांना मोठी लीड मिळाली.बदनापूर विधानसभा मतदार संघात खरी लढत ही भाजपचे नारायण कुचे व राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांच्यात झाली. निवडणूक प्रचारात झालेले आरोप- प्रत्यारोप, आघाडीने केलेली मोर्चे बांधणी, निवडणूक रिंगणातील इतर उमेदवार पाहता अनेकांनी या निवडणुकीत कुचे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राबविलेली प्रचार यंत्रणा, प्रत्येक बुथवर लावलेली फिल्डींग ही तगडी होती, हेच या निकालातून दिसून आले.बदनापूर विधानसभा मतदारसंघात बदनापूर, भोकरदन, अंबडसह अन्य दोन तालुक्यांतील गावे आहेत. मात्र या तीन तालुक्यांतील गावे मोठ्या प्रमाणात आहेत़ यापैकी भोकरदन तालुक्यातील गावांची मतमोजणी प्रथम सुरू झाली होती. त्यामधे आ. नारायण कुचे यांना भोकरदन तालुक्यातील गावांमधून एकूण १० हजारांचे मताधिक्य मिळाले आणि हे मताधिक्य पुढे वाढतच गेले़ मात्र हे बदनापूर व अंबड तालुक्यात भोकरदन तालुक्याएवढे मताधिक्य मिळाले नाही़बदनापूर शहरात लोकसभेच्या निवडणुकीत ९६५ मतांचे मताधिक्य आघाडीच्या उमेदवाराला मिळाले होते. मात्र यावेळी आ. नारायण कुचे यांना शंभर मतांची आघाडी मिळाली. म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा महायुतीला यावेळी बदनापूर शहरातून एक हजारापेक्षा जास्त मते मिळाली आहेत़ त्यातही शहरातील वार्ड क्र २ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा महायुतीच्या उमेदवाराला ४७५ मतांची आघाडी मिळाली.सलग आठ फेऱ्यांमधे महायुतीचे उमेदवार आ. नारायण कुचे यांना मताधिक्य मिळत असताना ९ व्या फेरीत आघाडीचे बबलू चौधरी यांना अवघ्या दहा मतांचे मताधिक्य मिळाले होते.नंतरच्या काही फे-यांमधेही मताधिक्य मिळाले. मात्र पुढे त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ झाली नाही.नुकताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे खा. रावसाहेब दानवे यांना या मतदारसंघातून तब्बल ६३ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला त्या तुलनेत कमी मताधिक्य मिळाले.यावरही भाजपला चिंतन करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019badnapur-acबदनापूरBJPभाजपा