शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'बिजल्या'ने पालटले शेतकऱ्याचे नशीब; २५ शर्यती जिंकल्या, आता ११ लाख ११ हजारांना विक्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:40 IST

बैल नव्हे, 'लकी चार्म'! ५१ हजारांचा 'बिजल्या' विकला ११ लाख ११ हजारांना

वाटूर (जालना) : मंठा तालुक्यातील कानफोडी येथील शेतकरी पवन राठोड हे एक बैल विकून लखपती झाले आहेत. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल. परंतु, हे खरे आहे. या कुशल शेतकऱ्याने पट्ट्यावरील धावणाऱ्या बैलाचे पालन-पोषण केले आणि त्याला उत्कृष्ट प्रशिक्षित करून तयार केले. त्यानंतर तो बैल ‘बिजल्या’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ज्यात घोड्यालाही घाम फोडवणारी ताकद असल्याचे बोलले जात होते.

बिजल्या हा शंकर पटातील बैल असल्यामुळे त्याचे मूल्य अधिक होते. त्याची उंची, ताकद आणि तालमेल पाहून त्याला उच्च किंमत दिली जात होती. अखेर सांगली जिल्ह्यातील कटरेवाडी येथील सागर कटरे यांनी हा बैल ११ लाख ११ हजार रुपयांना खरेदी केला. या विक्रीमुळे पवन राठोड यांचे आर्थिक जीवनच बदलले असून, ते एका दिवसात लखपती झाले आहेत. बैलावर प्रेम, नियमित प्रशिक्षण आणि काळजी घेतल्यामुळेच बिजल्या इतका मौल्यवान झाला. मेहनत आणि चिकाटीने एखाद्या प्राणी किंवा शेतीतील उत्पादनातून मोठा लाभ मिळवता येतो. बिजल्या विक्रीमुळे मंठा तालुक्यातील शेतकरी आणि प्राणीपालकांत उत्सुकता निर्माण झाली आहे, असे पवन राठोड यांनी सांगितले.

बिजल्याने ३० पैकी जिकल्या २५ शर्यतीशंकरपटतात शर्यतीत घोड्यांसोबत भाग घेतला आणि पहिलं स्थान पटकावले. जालना, वाशिम, जिंतूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील ३० पैकी २५ शर्यतींमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला असून, ३ ते ४ लाख रुपये कमाई केली आहे. रोज सकाळी ७ वाजता २ किमी चालून वर्कआऊट करून त्यांनी आपल्या फिटनेसचा रेकॉर्ड राखला आणि शर्यतीत घोड्यांसारखे धावून यश मिळवले.

सोशल मीडियावर ३ हजार फॉलोअर्स'बीजल्या' नावाचा बैल आता सोशल मीडियावरही चर्चेत आहे. इंस्टाग्रामवर त्याचा रिल पोस्ट होताच ३ हजार फॉलोअर्स झाले. मैदानात धावताना लोक त्याला 'बिजल्या' म्हणून हाक मारतात. ५ सेकंदात ६० पॉईंट धावत हा बैल मराठवाड्यातील धावपटू बैलांमध्ये अद्वितीय ठरला आहे.

५१ हजारांत घेतला हेाता विकतशेतकरी राठोड यांनी तमिळनाडूहून १० महिन्यांच्या वयात ५१ हजारांत विकत घेतलेला ‘बिजल्या’ आता प्रगतीपथावर आहे. १५ महिन्यांत त्याला आहारात रोज ३ लिटर दूध, १०० ग्रॅम बदाम, १ किलो उडीद डाळ, सायंकाळी मका व गहू भरडा दिला जातो. दर दोन दिवसांनी त्याची गरम पाण्याने अंघोळ घालून निगा राखली जात होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer's Luck Changes with 'Bijlya'; Sold for ₹11.11 Lakh

Web Summary : Farmer Pavan Rathod became a millionaire selling his bull 'Bijlya' for ₹11.11 Lakh after it won 25 races. Bijlya's diet and training made him valuable, changing Rathod's life.
टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी