शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

भीषण अपघात : समृद्धी महामार्गावर स्विफ्ट आणि इर्टिगा कारची समोरासमोर धडक ; ६ जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 07:42 IST

अपघातातील जखमी प्रवाशांना जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Samruddhi Highway Accident ( Marathi News ) : जालन्याजवळ समृद्धी महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी प्रवाशांना समृद्धी महामार्ग व शिंदखेडा राजा येथील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींमधील काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

अपघाताबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११ वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर पेट्रोलिंग करीत असताना नियंत्रण कक्ष समृद्धी यांच्याकडून महामार्गावर अपघात झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता  स्विफ्ट डिझायर ( क्रमांक एम एच १२, एम एफ १८५६) आणि इर्टिगा (क्रमांक एम एच ४७, बी पी ५४७८) यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याचं स्पष्ट झालं. यातील एक कार चुकीच्या दिशेने आल्याने हा अपघात झाला. सदर अपघातामध्ये इर्टिगा कारमधील फैजल शकील मन्सुरी, फय्याज मन्सुरी, अल्थ मेस मन्सुरी (सर्व राहणार मालाड पूर्व, मुंबई) आणि स्विफ्ट कारमधील लक्ष्मण मिसाळ, संदीप बुधवंत, विलास कायंदे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

नेमका कसा झाला अपघात?

इर्टिगा कारमधून सहा जण प्रवास करीत होते.  ते नागपूरहून मुंबईकडे जात होते. तसेच स्विफ्ट डिझायर कारमध्ये एकूण चार प्रवासी प्रवास करीत होते. ही कार विरुद्ध दिशेने सिंदखेड राजाकडे जात असताना समोरासमोर धडकून होऊन अपघात झाला आहे. सदर अपघातातील गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना समृद्धी महामार्ग व शिंदखेडा राजा येथील रुग्णवाहिकेद्वारे तात्काळ सामान्य रुग्णालय, जालना इथं पाठवण्यात आलं. तसंच गाडीत अडकलेल्या लोकांना कटरच्या साहाय्याने दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.

दरम्यान, महामार्ग परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस निरीक्षक गिरी आणि पोलीस स्टेशन तालुका येथील पोलीस निरीक्षक उनवणे, पोलीस स्टेशन चंदंजिरा येथील पोलीस निरीक्षक परदेशी यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताची पाहणी केली.

टॅग्स :Jalna civil hospitalजिल्हा रुग्णालय जालनाSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात