शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मोठी बातमी! मनोज जरांगे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून करणार बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:01 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा होण्याची चिन्हं आहेत.

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी १६ सप्टेंबरच्या मध्यरात्री बारा वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा आज सकाळी अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेतून केली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून स्वतंत्र आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे. 

आज सकाळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका केली आहे. "आमचा नोंदीचा रेकॉर्ड कसा जळाला, त्याचा पंचनामा कुठेय?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिंदे समितीला मुदतवाढ देऊनही कोणताही ठोस परिणाम मिळाला नसल्याची टीका त्यांनी केली. हैदराबादमध्ये सापडलेले ८ हजार पुरावे कुठे आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटलं की, "फडणवीस तिहेरी पद्धतीने मराठा समाजाला संपवत आहेत."

"माझ्या उपोषणाकडे कुणी येवो अथवा न येवो, आता सरकारला कळेल उपोषण किती खतरनाक असतं," असं जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेला संयम राखण्याचं आवाहन केलं आणि कोणत्याही प्रकारचं आंदोलन न करण्याचं आवाहन केलं.

तुम्ही पक्षासाठी तर मी समाजासाठी बोलतोमनोज जरांगे पाटील यांनी भाजपच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर देखील जहरी टीका केली. "मराठ्यांचं मतदान तुम्हाला निवडणुकीत मिळालं नाही, हे स्पष्ट करा," असा सवाल त्यांनी केला. तसेच त्यांनी म्हटलं, "माझं राजकारणात जाण्याचं कोणतंही स्वप्न नाही, मला फक्त माझ्या समाजाला न्याय मिळावा, एवढीच माझी मागणी आहे." आमदार राऊत यांना उद्देशून त्यांनी म्हणलं, "तुम्ही पक्षासाठी बोलता, मी समाजासाठी बोलतो. दुसऱ्यासाठी वेगळा आणि स्वतःसाठी वेगळा न्याय ही कोणती कामाची पद्धत आहे?" त्यांनी फडणवीस यांचं समर्थन करणाऱ्या आमदारांना देखील सावध राहण्याचा इशारा दिला. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, "गरीब मराठ्यांमध्ये कधीही फूट पडत नाही, श्रीमंतीची फूट पहिल्यापासून आहे."

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना