शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: शंभूराज देसाईंची शिष्टाई यशस्वी; जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला १ महिन्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:31 IST

आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक महिन्याची वेळ दिली आहे.

Manoj Jarange Patil ( Marathi News ) :मराठा आरक्षणासाठीजालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. राज्याचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केलेल्या विनंतीनंतर आपल्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी एक महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे आज सहाव्या दिवशी मनोज जरांगे आपलं उपोषण स्थगित करणार आहेत.

शंभूराज देसाई यांनी आज मनोज जरांगेंची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांबाबत सरकारी पातळीवर कसं काम सुरू आहे, याबाबतची माहिती दिली. मात्र सरकारला पुरेसा वेळ दिल्यानंतरही सरकार योग्य गतीने काम करत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला.  मागील दोन महिने राज्यात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू असल्याने निर्णयप्रक्रियेत विलंब झाल्याचं शंभूराज देसाई यांच्याकडून सांगण्यात आलं. तसंच मी स्वत: उद्यापासून अधिकाऱ्यांची बैठक घेईल आणि लवकरात लवकर सगेसोयरे अधिसूचनेबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करेन, असा शब्द देसाई यांनी दिला.

जरांगेंच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या प्रमुख मागण्यांविषयीची माहिती शंभूराज देसाई यांना दिली. "आम्ही तुम्हाला एक दिवसाचाही वेळ देणार नव्हतो, पण तुमचा शब्द मला मोडता येत नाही. त्यामुळे तुम्हाला एक महिन्याचा वेळ देतो. १३ जुलैपर्यंत सरकारने सर्व मागण्यांबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडणार," असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

पहिली मागणी - सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी

दुसरी मागणी - मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, याबाबतचा कायदा करावा

तिसरी मागणी - अंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत

चौथी मागणी - हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा

पाचवी मागणी - कुणबी नोंदी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिंदे समितीला एक वर्षांसाठी मुदतवाढ द्यावी

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणShambhuraj Desaiशंभूराज देसाईEknath Shindeएकनाथ शिंदेJalanaजालना