मोरेश्वर महाविद्यालय,
शहरातील मोरेश्वर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात संस्थेचे कोषाध्यक्ष तथा आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. भगवान डोंगरे, शांताराम गव्हाणे, डॉ. रघुनाथ सपकाळ, किरण मोरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
------------------
छत्रपती शिवाजी महाविद्यालय, भोकरदन
शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. एस. एस. गोरे, गायके, प्राचार्य व्ही.पी. शेळके, प्रा. आर.एस. मिसाळ, प्रा. एच. व्ही. नागरगोजे, एम. एस. बरडे, एस. एम. तळेकर, एम. एम. ढाकणे आदींची उपस्थिती होती.
------------------
नगरपरिषद कार्यालय
शहरातील नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्षा मंजुषा देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष इरफान सिद्दीकी, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्षा आशा माळी, संतोष अन्नदाते, नसीम पठाण, दीपक बोर्डे, कार्यालयीन अधीक्षक वामन आडे, नगरअभियंता कैलास ढेपले यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष गोरड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्या हस्ते तर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
उपविभागीय अधिकारी कार्यालय
उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी अंजली कानडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष गोरड, नायब तहसीलदार के. टी. तांगडे, माजी आमदार संतोषराव दसपुते, नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिकांची उपस्थिती होती.
संभाजी विद्यालय, तांदुळवाडी
तांदुळवाडी येथील श्री छत्रपती संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य संजय पैठणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सहशिक्षक डी.बी. ठाकरे, के. व्ही. फुके, पी.एम. पाटील, व्ही. बी. कल्याणकर, प्रा. अंकुश जाधव, प्रा.आशा ठाकुर, उषा खैरे, कमल सोनवणे, जे. एच. सुरासे, एम. बी. भंडारे, एच. यू. गव्हाड यांच्यासह पालक उपस्थित होते.
जनविकास शिक्षण संस्था, भोकरदन
भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था, संचलित श्री गणपती इंग्लिश, मराठी विद्यालय, पायोनियर इंटरनॅशनल सी.बी.एस.ई स्कूल, जोमाळा, स्व. अॅड. भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय, जोमाळा येथे संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा मंजुषा देशमुख, नगरसेविका गयाबाई जाधव, निर्मला भिसे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, संचालक तुषार पाटील, उद्योजक मोहन हिरवरकर, महादू राजपूत, हुकुम चुडावंत, बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, दादाराव देशमुख, अमोल शिंदे, प्राचार्य बी. एम. तांबारे, मुख्याधापक पी. बी. रोजेकर, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, पर्यवेक्षक जी. व्ही. जाधव, गजानन बुलगे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.