शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

भीमा तुझ्या जन्मामुळे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:59 IST

जालना शहर व जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवारी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व जिल्ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शनिवारी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. सायंकाळी शहरातून काढण्यात आलेल्या मुख्य मिरवणुकीत ‘भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे...’ आदी भीम गीतांसह जय भीमच्या घोषणांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला. शहरात भीमसागर उसळल्याने वातावरण भारावून गेले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शनिवारी सकाळपासून विविध पक्ष, संघटना, शाळा, महाविद्यालयांमध्ये अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. सकाळी शहरातील गांधी चमन चौकातून संविधान रॅली काढण्यात आली. यावेळी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी. आ. कैलास गोरंट्याल, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, संविधान रॅलीचे संस्थापक दिनकर घेवंदे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विजय बनकर, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, कल्याण दळे, भीमराव डोंगरे, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, बी. एम. साळवे, कल्पना त्रिभुवन, धर्मा खिल्लारे आदींची उपस्थिती होती. मस्तगड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. याठिकाणी विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अभिवादनाचा कार्यक्रम दिवसभर सुरू राहिला. जयंतीचा खरा उत्साह सायंकाळी मुख्य मिरवणुकीत पहायला मिळाला. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार बिपीन पाटील, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, एकबाल पाशा, महेंद्र रत्नपारखे, अंकुशराव राऊत, अ‍ॅड. बी.एम. साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिचन बारी, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, महादेव राऊत, यशवंत जाधव यांच्या उपस्थितीत पाणीवेस भागातून मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. विविध भागांतून आलेली वाहने मुख्य मिरवणुकीत सहभागी झाली. मिरवणुकीत तरुणाईसह महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. शहरातील मुख्य रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा उत्साह पहायला मिळला. मिरवणुकीतील नागरिकांना मराठा महासंघाच्या वतीने पाणी वाटप करण्यात आले.पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, आ. राजेश टोपे, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे आदींनी शहरातील मस्तगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीSocialसामाजिक